घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकाळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांचा मज्जाव; संयोगीताराजेचा पोस्टद्वारे आरोप

काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांचा मज्जाव; संयोगीताराजेचा पोस्टद्वारे आरोप

Subscribe

नाशिक : काही दिवसांपूर्वी काळाराम मंदिरात पूजा करताना मंदिरातील महंतांनी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. मात्र, छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्यातील असल्याने मी त्याला विरोध दर्शवला. मात्र, वेदोक्त मंत्र म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही असे महंतांनी सांगितले, अशा आशयाची सोशल मीडिया पोस्ट संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजेंनी रामनवमीच्या दिवशी केल्याने चर्चांना एकच उधाण आले आहे.

देशभरात काल रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर संयोगिताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली,. यावेळी महंतांनी ही पूजा पुराणेक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. यास संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले. हा सगळा प्रकार संयोगीता राजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून प्रतिक्रिया व्यक्त केली.

- Advertisement -

सोशल मीडियावरील पोस्टचा आशय असा..

संयोगिताराजे यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी मंदिरात महामृत्यूंजय मंत्र म्हटला. मंदिरातील महंतांनी पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हटले. मात्र, शाहू महाराजांनी कर्मकांडाला विरोध केल्याने आणि आपण त्या घराण्याचा वारसा चालवत असल्याने त्यास विरोध केला. यावेळी महंतांनी तुम्हाला वेदोक्त मंत्र म्हणण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट केले. मात्र, यास न जुमानता मी महामृत्युंजय मंत्र, रामरक्षा पठण केले. त्यावेळी त्यांना सांगितले की, ज्या मंदिरात आपण आजच्या काळातही नियम लावत आहात ती मंदिरे छत्रपतींनी वाचवली. मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -