राज्यभरात बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिकांचं शक्तीप्रदर्शन

राज्यभरात बंडखोर आमदारांविरोधात  शिवसैनिकांचं शक्तीप्रदर्शन

एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणावर ढवळून निघालं. सत्ता संघर्ष सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) विरुद्ध बंडखोर नेते एकनाथ शिंदे या वादाला सुद्धा तोंड फुटले. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी शक्ती प्रदर्शन केले जात आहे.

मुंबईत सुद्धा शिवसेनेकडून (shivsena) शक्तीप्रदर्शन सुरु आहे. मुंबई मध्ये सामना कार्यालय ते शिवसेना भवन येथे बाईक रॅली काढण्यात आली. त्याचबरोबर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आदित्य ठाकरे सुद्धा आज मुंबईत मेळावा घेणार आहेत. हा मेळावा घेण्यामागचा असा हेतू आहे, की सर्व शिवसैनिकांना एकत्र ठेवण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. संजय राऊत हे नेहमीच त्यांची मतं परखडपणे मांडत असतात. सध्या राज्यात आमदारांनी जी काही बंडखोरी केली आहे त्यावरही संजय राऊत हे स्पष्ट प्रतिक्रया देत आहेत. सध्या राज्यात जो काही सत्ता संघर्ष आणि राजकीय गोंधळ सुरु आहे त्यामुळे विविध ठिकाणी रॅली काढली जात आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट आणि या दोन्ही घटनांचे समर्थक शक्ती प्रदर्शन करत आहेत.

हे ही वाचा – शिंदे गटातील 15 बंडखोर आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफची टीम तैनात

आदित्य ठाकरे यांचा इशारा – 

विधान भावनाकडे जाणारे रस्ते हे वरळी, वांद्रे, परेल आणि भायखळ्यातून जातात, हे लक्षात ठेवा अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना सुचक इशारा दिला. त्याचबरोबर मुंबई एअरपोर्टवर उत्तराला तेव्हा लक्षात ठेवा, मग केंद्राने भलेही आर्मी लावावी किंवा मग SRPF असंही आदित्य ठाकरे म्हणाले. हे सगळं म्हणत आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी एक प्रकारे बंडखोर आमदारांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे.

 

हे ही वाचा –  शिंदे गटाला भाजपकडून मोठी ऑफर, बंडखोर आमदारांमध्ये खलबतं सुरु

दरम्यान विधानपरिषदेची निवडणूक (vidhanparishad electin) झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला आणि त्याचे पडसाद हे आज सहा दिवस झाले तरीही दिसत आहेत. दिवसागणिक या प्रकरणाची तीव्रता आणि गांभीरता वाढत आहे. या एकूणच परिस्थिती मुळे महाराष्ट्रा मधील राजकारण मोठ्या प्रमाणावर ढवळून निघाले आहे. आणि त्याचे पडसाद हे राज्यात विविध ठिकाणी दिसत आहेत. अशातच आज शिवसैनिकांनी बाईक रॅली काढत मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन केले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM uddhav thackeray) यांना समर्थन दर्शविले.

 

 

 

First Published on: June 26, 2022 1:27 PM
Exit mobile version