अँटिजेन चाचणीत आढळले ५ पॉझिटिव्ह

अँटिजेन चाचणीत आढळले ५ पॉझिटिव्ह

नियमांचे उल्लंघन करून विनाकारण आणि विनामास्क फिरणार्‍यांची सोमवारी तालुका आरोग्य विभागाकडून अँटिजेन चाचणी शहरासह परळी आणि उन्हेरे फाट्यावर करण्यात आली आहे. दुपारपर्यंत 45 जणांची अँटिजेन चाचणी करण्यात आली त्यात 5 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी दिली.

येथे झालेल्या कारवाईत नगर पंचायत शिपाई प्रवीण थळे, रुपेश मुसळे, पोलीस कर्मचारी प्रफुल्ल चांदोरकर, हेमंत कुथे, राजेंद्र राठोड, शंकर साळवे, होमगार्ड सचिन माडे, स्वप्निल पालकर, राहुल दिघे, रुग्णवाहिका चालक समाधान भगत, वीरसिंग कुशवाह आणि जयेश बावकर सहभागी झाले होते. तहसीलदार दिलीप रायन्नावार, डॉ. मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.

सर्वच नागरिकांनी शासन नियमांचे पालन केले पाहिजे. तसेच योग्य खबरदारी आणि काळजी घेणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन करून विनाकारण बाहेर फिरणे आणि सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.
-डॉ. शशिकांत मढवी, तालुका वैद्यकीय अधिकारी, सुधागड

First Published on: June 7, 2021 8:08 PM
Exit mobile version