म्हसळेतील १३ पैकी ६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होण्याच्या मार्गावर

म्हसळेतील १३ पैकी ६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होण्याच्या मार्गावर

म्हसळे: तालुक्यातीळ १३ ग्राम पंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत असून शेवटच्या दिवशी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रकिया पुर्ण झाली. १३ पैकी ६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहेत, तर ७ ग्रामपंचायतीमध्ये राजकीय अस्तित्वासाठी निवडणूक होणार असल्याचे निदर्शनास येत आहे. मोठ्या लोकवस्तीच्या खरसई,काळसुरी,कणघर,कांदलवाडा,निगडी आणि फळसप या सहा ग्राम पंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुका बिनविरोध होणार आहेत.रेवळी ग्राम पंचायतीमध्ये सरपंच पद अनुसूचित जमाती करीता राखीव असल्याने तेथे एकही अर्ज दाखल झालेला नाही ७ सदस्य पदासाठी ९ अर्ज दाखल करण्यात आले असल्याने एक वार्डात सदस्य पदासाठी निवडणूक होणार असल्याचे समजते.

१३ सरपंच आणि ९४ सदस्य संख्यासाठी अर्ज दाखल करण्याचे शेवटच्या दिवशी वरील सहा ग्राम पंचायतीचे सरपंच व सदस्य बिनविरोध तर निवडणुक होणार्‍या ७ ग्रामपंचायतींपैकी तोंडसुरे सरपंच पदासाठी ४ सदस्य पदासाठी ८ अर्ज,तोराडी सरपंच पदासाठी २ अर्ज,सदस्य पदासाठी १५ अर्ज,देवघर सरपंच पदासाठी ६ आणि सदस्य पदासाठी ३० अर्ज,घोणसे सरपंच पदासाठी ६ आणि सदस्य पदासाठी १० अर्ज,लेप सरपंच पदासाठी २ सदस्य पदासाठी ११ अर्ज,संदेरी सरपंच पदासाठी ४ आणि सदस्य पदासाठी फक्त १८ अर्ज दाखल झाले असल्याचे संबंधीत ग्राम पंचायतीचे निवडणुक पिठासीन अधिकारी यानी माहिती देताना सांगितले.

संगणक प्रणाली द्वारे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास विलंब लागत असल्याने निवडणुक आयोगाने ऑफ लाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले असता अर्ज दाखल करण्याचे शेवटच्या दिवशी इच्छूक सर्वच राजकिय पक्षांचे उमेदवारानी आपले अर्ज दाखल केले आहेत.म्हसळे तालुक्यात बिनविरोध सहा ग्राम पंचायती वगळता तोराडी,तोंडसुरे,घोणसे,देवघर,संदेरी,लेप या ६ ग्राम पंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्य पदासाठी आघाडी विरोधात शिवसेना शिंदे गट,भाजप,शेकाप अशी लढत होण्याची शक्यता आहे.

First Published on: December 2, 2022 10:09 PM
Exit mobile version