मुरुडमध्ये ग्रामपंचायत सदस्यपदासाठी २६ तर सरपंच पदासाठी ४ उमेदवारी अर्ज दाखल

मुरुडमध्ये ग्रामपंचायत सदस्यपदासाठी २६ तर सरपंच पदासाठी ४ उमेदवारी अर्ज दाखल

Exif_JPEG_420

 

मुरुड: मुरुड तालुक्यातील काकळघर,वावडुंगी,वेळास्ते,तेलवडे,कोर्लई या ५ग्रामपंचायत करिता शुक्रवारी तिसर्‍या दिवशी ग्रामपंचायत सदस्य पदाकरीता ३तर थेट सरपंच पदाकरीता ४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
मुरुड – दरबार हॉल येथे निवडणूकी उमेदवारी अर्ज भरण्याकरिता सकाळी काकळघर ग्रामपंचायतमधून सदस्य पदा करिता पल्लवी भोईर-काकळघर प्रभाग ३ मधून सदस्य पदाकरीता,रसिका थळे -काकळघर प्रभाग क्रमांक ३ मधून सदस्य पदाकरीता, निशांत दांडेकर यांनी काकळघर प्रभाग २ मधून सदस्य पदाकरीता उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी आशिष मुकणे यांच्याकडे सुपुर्द केले.
कोर्लई ग्रामपंचायतमधून थेट सरपंच पदाकरीता राजश्री मिसाळ, धनिषा बलकवडे तर सदस्य पदाकरीता वेरोनिका मार्तीस ,मरीना, मोरीस मार्तीस ,रेश्मा रमेश मिसाळ -कोर्लई प्रभाग क्रमांक १ मधून जितेंद्र पाटील, प्र्रभाग ३ मधून प्रशांत मिसाळ, प्रभाग २ मधून ,उमेश मिसाळ, कोर्लई प्रभाग २ मधून गोविंदवाघमारे, प्रभाग १ मधून उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुनेश्वर यांच्या कडे सुपुर्द केले.
वेळास्ते ग्रामपंचायत मधुन प्रभाग २मधून थेट सरपंच पदाकरीता समिक्षा चिले, तर सदस्य पदाकरीता पांडुरंग महादेव पतेने, प्रभाग३ प्रियंका पारदले, प्रभाग३ मधून सोनाली शिंदे ,मिलिंद मंगेश खेडेकर, प्रभाग २ मधून,सुप्रिया गायकर, प्रभाग२ मधून उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी राकेश पाटीला आणि सहाय्यक निवडणूक उमेदवारी प्रकाश आरेकर यांच्या कडे सुपुर्द केला.

वावडुंगी ग्रामपंचायत
वावडुंगी ग्रामपंचायत मधुन सदस्य पदाकरीता पुनम महाडिक प्रभाग क्रमांक १ मधून,सुर्वणा भुवड प्रभाग क्रमांक ३ मधुन,विकास परशुराम मोरे प्रभाग १ मधुन,निलम नितिन भुवड- प्रभाग क्रमांक २ मधु उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी साहिल मुजावर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी -मनोज पुलेकर यांच्याकडे अर्जसुपुर्द केले.

तेलवडे ग्रामपंचायत

तेलवडे ग्रामपंचायत निवडणुकीकरिता प्रभाग १मधुन थेट सरपंच पदाकरीता कल्पना अंकुश पवार तर सदस्य पदाकरीता निलेश हरिश्चंद्र तांबडकर प्रभाग ३ मधून, वसुंधरा करमरकर. प्रभाग१ मधुन, कमल वारगे प्रभाग ३ मधून अनिता वारगे- प्रभाग२ मधून, प्रज्ञा बैकर,प्रभाग १ मधुन, रुपाली रमेश वाघमारे – प्रभाग १ मधुन उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप गायकवाड यांच्याकडे सुपुर्द केले.

सरपंच पदाकरीता १० तर सदस्य पदाकरीता ३०उमेदवारी अर्ज

परशुराम वाघमारे प्रभाग ३ मधून यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे सुपुर्द केला. यावेळी हरी भेकरे,ऋषिकांत डोंगरीकर,भाई सुर्वे, दिपेश वरणकर, शुभांगी करडे संदिप महाडिक आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. आता पर्यंत या ५ग्रामपंचायत सरपंच पदाकरीता १० तर सदस्य पदाकरीता ३०उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

First Published on: December 2, 2022 5:06 PM
Exit mobile version