पडलेल्या वीज खांबांची तात्पुरती उभारणी, नागरिकांच्या जीवास धोका

पडलेल्या वीज खांबांची तात्पुरती उभारणी, नागरिकांच्या जीवास धोका

पोलादपूर महावितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकारी यांनी विजेचे खांब बसवताना केलेल्या निकृष्ठ कामामुळे बळी जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.तालुक्याच्या कालावली गावाच्या परिसरात दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास पडलेल्या पावसात दोन विजेचे खांब पडले. त्यामुळे कालवली गाव पाटीलवाडी मुस्लीम मोहल्ला मधील घरे दोन दिवस अंधारात बुडाली होती.

येथील ग्रामस्थांनी वीजपुरवठा पूर्ववत चाल ूहोण्यासाठी महावितरणच्या अधिकार्‍यांना विचारणा केली असता ठेकेदार काम करेल असे सांगण्यात आले. तर ठेकेदाराला विचारले असता माझे पूर्वीचे बील दिले नसल्याचे कारण त्याने दिले. या टोलवाटोलवीमुळे दोन दिवसानंतर ग्रामस्थांच्या संतापाचा पारा चढल्याचे पाहून वरमलेल्या वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी अखेर उन्मळून पडलेले लोखंडी खांब चक्क खड्डा खोदून उभे केले. अखेरीस तिसर्‍या दिवशी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वीजप्रवाह चालू केला. मात्र हे खांब उभे करताना खोदलेल्या खड्डयात दगड गोठे व माती टाकली आहे. सिमेंट वाळूखडी मिश्रीत काँक्रीट पोलच्या सभोवताली टाकून खड्डे बुजविण्यात येतात. तसेच खड्डयातील सिमेंट कॉक्रीट पूर्ण वाळल्यानंतर त्यावर वीज तारांची जोडणी केली जात असते. मात्र येथे वीज कंपनीच्या अधिकार्‍याने उभे केलेले पोल चक्रीवादळासह पाऊस आला पुन्हा कोसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते.

कालवली स्टॉपजवळच असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून जवळच दोन लोखंडी पोल पडले होते. तर तिसरा पोल थोडा झुकला असून पुढील सहा पोल तिरके झाले आहेत. त्यामुळे ते पोल कधीही कोसळण्याच्या बेतात आहे. ही वीज लाईन पाटीलवाडीपर्यंत गेली आहे. तसेच येथून मोहल्ला व खानवाडीकडे गेलेल्या लाईनकडेही एक पोल पडला असून तो जोडण्यात आलेला नाही. या परिसरातील हावरे, कण गुले, सवाद, माटवण , धारवली कोंड , धारवली पा टीलवाडी, धारवली गाव, विठ्ठळवाडी, वावे या गावा च्या हदीतील विजेचे पोल सडलेले व जुने झालेले आहेत. त्यामुळे धोकादायक स्थितीतील पोल तातडीने महावितरण कंपनीने बदलावेत अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

First Published on: January 14, 2022 8:02 PM
Exit mobile version