पालीत मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात

पालीत मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात

पाली: अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीमध्ये नगरपंचायततर्फे नालेसफाईला सुरुवात झाली असल्याने पावसाळ्यात गटारे आणि नाले तुंबण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नसल्याची चिन्हे आहेत.
पाणी बॉटल, प्लॅस्टिकच्या पिशव्या, घरगुती कचरा,गाळ यामुळे ठिकठिकाणी नाले, गटारे तुंबली होती. या तूंबलेल्या गटारांमुळे सर्वत्र घाण आणि दुर्गंधी पसरली होती. मात्र नालेसफाई सुरुवात झाल्याने या सर्व समस्या काही दिवसांत मार्गी लागणार आहेत. नगरपंचायतच्यावतीने कंत्राटी कामगार घेऊन नालेसफाई केली जात आहे. जेसीबी, ट्रॅक्टर तसेच पारंपरिक साधने आदी साधनांचा वापर करून गटारे आणि नाल्यातील घाण, कचरा काढला जात आहे. याबरोबरच गटारे आणि नाल्याभोवती उगवलेले गवत, झाडे झुडपे देखील काढली जात आहेत.

मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण नगरपंचायत हद्दीतील नालेसफाईची कामे पूर्ण होतील. नालेसफाईची कामे चांगली आणि वेळेत व्हावीत यासाठी स्वतः लक्ष देत आहे. तसेच स्वच्छता सभापती, नगरसेवकही या कामांवर लक्ष ठेऊन आहेत. नागरिकांनी आवाहन आहे की त्यांनी प्लास्टिक बॉटल, पिशव्या, घरातील कचरा गटारे किंवा नाल्यात टाकू नये.
प्रणाली शेळके,
नगराध्यक्षा, नगरपंचायत पाली

First Published on: May 24, 2023 9:39 PM
Exit mobile version