महिलांच्या समस्यांचे निवारण करण्यात येईल – गटविकास अधिकारी संगिता भांगरे

महिलांच्या समस्यांचे निवारण करण्यात येईल – गटविकास अधिकारी संगिता भांगरे

Exif_JPEG_420

मुरुड: समस्याग्रस्त आणि पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा,या दृष्टीने महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा प्राप्त व्हावी यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात शासनाच्या विविध विभागांचे जवळपास १२ स्टॉल लावण्यात आले आहे. योजना संबंधी महिलांनी भेडसावणार्‍या समस्या आणि अडचणी सादर कराव्यात, त्याबाबत संबंधित शासकीय कार्यालयामार्फत निराकरण करण्यात येईल, अशी ग्वाही गटविकास अधिकारी संगिता भांगरे यांनी येथे दिली.
पंचायत समितीचे माजी सभापती आशिका ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन आणि जिल्हा परिषद अलिबाग प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
यावेळी जिल्हा परिषद अलिबाग प्रकल्प संचालक मोरे, तहसीलदार रोहन शिंदे, गटविकास अधिकारी संगिता भांगरे, महिला बालकल्याण विस्तार अधिकारी संजय शेंडगे, प्रशासन अधिकारी संजय वानखेडे, पोलिस निरीक्षक प्रकाश सकपाळ, नायब तहसीलदार रविंद्र सानप, नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, तालुका कृषी अधिकारी विश्वजीत अहिरे, पशुसंवर्धन अधिकारी सुदर्शन पाडावे, मुरुड पंचायत समिती माजी सभापती आशिका ठाकुर, माजी उपसभापती प्रणिता पाटील,पर्यवेक्षिका सुवर्णा चांदोरकर,शुभांगी कोतवाल, विश्वनाथ म्हात्रे,अंकिता घोडेकर,संतोष पुकळे, दत्तात्रेय सांतामकर, सुनील काळे,कनिष्ठ सहाय्यक आशा सोनकुसरे, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षण विभाग, तालुक्यातील पात्र लाभार्थी आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

शिबिरात २१७ महिलांचा सहभाग
सशक्त नारी समृद्ध भारत व मुरुड एकात्मिक बालविकास विभागाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुरुड दरबार हॉल येथे आयोजित स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिरात गटविकास अधिकारी संगिता भांगरे बोलत होत्या. या शिबिरात २१७ महिला सहभागी झाल्या होत्या. यापैकी ४४ महिलांनी आपली समस्या नोंदविली आणि त्या समस्यांबाबत निराकरण करण्यात आले.

स्टॉल्सद्वारे शासकीय योजनांची माहिती
या शिबिरात मुरुड जंजिरा नगरपरिषद, महसूल विभाग, मुरुड पोलिस विभाग, अन्न व नागरी पुरवठा, पशुसंवर्धन विभाग, ग्रामविकास आणि जलसंधारण विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मुरुड, कृषी विभाग, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प मुरुड, आरोग्य विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र, पंचायत समिती शिक्षण विभाग असे एकूण १२ स्टॉल्सद्वारे शासकीय योजना बाबत सर्व योजनांची माहिती देण्यात आली.

First Published on: May 25, 2023 10:06 PM
Exit mobile version