राहुलला वगळून रोहितला संधी द्या! -गांगुली

राहुलला वगळून रोहितला संधी द्या! -गांगुली

भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच झालेली वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका २-० अशी जिंकली. या मालिकेत भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि सलामीवीर लोकेश राहुल कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष होते. या दोघांना मागील काही काळात कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. परंतु,रहाणेने या मालिकेत १ शतक आणि २ अर्धशतके करत टीकाकारांची तोंडे बंद केली. राहुलला मात्र ४ डावांमध्ये केवळ १०१ धावाच करता आल्या. त्यामुळे आता राहुलला वगळून रोहित शर्माला कसोटी संघात सलामीवीर म्हणून खेळवले पाहिजे, असे भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीला वाटते.

कसोटी क्रिकेटमध्ये भारतापुढे अजूनही सलामीच्या जोडीचा प्रश्न आहे. मयांक अगरवाल चांगला खेळाडू वाटतो. त्याचा सलामीचा साथी, लोकेश राहुलने मात्र फारसे प्रभावित केलेले नाही. त्यामुळे त्याच्या जागी दुसर्‍या एखाद्या फलंदाजाला संधी मिळायला हरकत नाही. रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळवले पाहिजे, असे मी आधी म्हणालो आहे. मला अजूनही असे वाटते की, रोहितला कसोटीत सलामी करण्याचीसंधी मिळाली पाहिजे. त्याच्यासारख्या खेळाडूला तुम्ही फारकाळ संघाबाहेर ठेवू शकत नाही. रोहितने विश्वचषकात उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यामुळे आता तो कसोटीतही सलामीवीर म्हणून खेळण्यास उत्सुक असेल. अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी उत्तम कामगिरी केल्याने रोहितला मधल्या फळीत खेळण्याची आता गरज नाही, असे गांगुली म्हणाला.

First Published on: September 6, 2019 1:05 AM
Exit mobile version