हैदराबाद ओपन बॅडमिंटन स्पर्धा : भारताचा समीर वर्मा विजयी

हैदराबाद ओपन बॅडमिंटन स्पर्धा : भारताचा समीर वर्मा विजयी

समीर वर्मा विजयी

हैदराबादमध्ये पार पडलेल्या हैदराबाद ओपन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या समीर वर्माने अंतिम सामन्यात मलेशियाच्या सूंग जू वेनला अवघ्या दोन सेट्समध्ये नमवत सामन्यात विजय मिळवला आहे. समीरने २१-१५, २१-१८ अशा दोन सरळ सेट्समध्ये समीरने विजय मिळवला असून या विजयासोबतच समीरने स्पर्धेतही अजिंक्यपद पटकावले आहे. समीर वर्माने उपांत्य फेरीत भारताच्याच आर. एम. व्ही. गुरूसाईदत्तला १६-२१,२१-१५ आणि २१-११ असा तिन सेट्समध्ये नमवत अंतिम फेरी गाठली होती.

असा झाला सामना

समीर आणि सूंग जू वेन यांच्यातील सामना अवघ्या दोन राउंडमध्ये संपला. सामन्यात सुरूवातीपासूनच समीरने आपला दबदबा कायम ठेवला. पहिलाच सेट २१-१५ च्या मोठ्या फरकाने जिंकत समीरने सामन्यात १-० ची आघाडी घेतली त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये सूंगने चांगली टक्कर द्यायचा प्रयत्न केला खरा मा६ समीरने अप्रतिम खेळ करत २१-१८ च्या फरकाने सेट जिंकला आणि सामनाही आपल्या नावे करत स्पर्धेचे विजेतेपद मिळवला.

विजेत्यांना भरघोस बक्षिसं

हैदराबाद ओपन मध्ये एकूण ७५ हजार डॉलर्सची बक्षिस वाटली गेली असून भारतीय चलनानुसार ५४ लाखाची इतकी बक्षिसांची रक्कम आहे. ज्यात पुरूष एकेरीत विजय मिळवलेल्या समीरला ४ लाख रूपये तर उपविजेत्या सूंग जू वेनला २ लाख रूपये बक्षिस देण्यात आलं आहे.

First Published on: September 10, 2018 12:56 PM
Exit mobile version