आयपीएल लिलावातून बीसीसीआयला ४८ हजार कोटी, मीडिया राईट्सची विक्री पूर्ण

आयपीएल लिलावातून बीसीसीआयला ४८ हजार कोटी, मीडिया राईट्सची विक्री पूर्ण

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल मीडिया राईट्सच्या (IPL media rights) नावांची घोषणा केली आहे. यामध्ये तीन मोठ्या कंपन्यांनी ४८ हजार ३९० कोटी रूपयांना ५ वर्षांसाठी आयपीएलचे हक्क विकत घेतल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले आहे. आयपीएलच्या ट्विटर अकाऊंटवर स्टार स्पोर्ट्स इंडिया, वायकॉम१८ आणि टाइम्स इंटरनेटने मीडियाचे हक्क विकत घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

भारतातील टीव्ही मीडिया राईट्सच्या शर्यतीत डिजनी स्टारने डिजीटलच्या हक्कांसाठी वायकॉम १८ ने बाजी मारली आहे. त्यामुळे आयपीएलचे सर्व सामने हे स्टार स्पोर्ट्सवरच दिसणार आहेत. याशिवाय पॅकेज सी ज्यामध्ये एका सीजनच्या १८ निवडक सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क असणार आहेत. ते वायकॉम १८ ने विकत घेतले आहे. या बाबतची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्वीट करत दिली आहे.

सुरुवातीपासूनच आयपीएल हा विकासासाठी समानार्थी शब्द आहे. कारण ई-लिलावाने नवीन उच्चांक गाठला असून आयएनआर ४८ हजार ३९० कोटी मूल्य इतकं आहे. तसेच या लिलावानंतर आयपीएल जगातील दुसरी सर्वात महागडी लीग झाल्याचं त्यांनी जय शाह यांनी म्हटलं आहे.

आयपीएल २०२३ ते २०२७ या दरम्यानच्या काळात म्हणजेच पुढील पाच हंगामासाठी आयपीएल प्रसारण हक्कांसाठीची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये टिव्ही आणि डिजिटल हक्क, प्लेऑफच्या निवडक सामन्यांसाठीचे हक्क आणि परदेशात आयपीएल सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क अशा एकूण चार पॅकेज्सची विक्री यावेळी करण्यात आली आहे. त्यामुळे हा संपूर्ण व्यवहार ४८ हजार ३९० कोटींमध्ये झाला आहे.


हेही वाचा : सचिनप्रमाणेच आता ‘या’ खेळाडूला खेळताना पाहण्यासाठी उत्साही : सुनिल गावस्कर


 

First Published on: June 14, 2022 8:11 PM
Exit mobile version