इंग्लंडचा महान बॅट्समन अॅलिस्टर कूक होणार निवृत्त !

इंग्लंडचा महान बॅट्समन अॅलिस्टर कूक होणार निवृत्त !

अॅलिस्टर कूक

इंग्लंड क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि उत्कृष्ट बॅट्समन अॅलिस्टर कूकने क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केला आहे. सध्या भारताविरुध्द इंग्लंड कसोटी सामने सुरु आहेत. यातील शेवटच्या कसोटी सामन्यानंतर अॅलिस्टर कूक निवृत्त होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी तो निवृत्त होणार असला तरी तो इंग्लंडच्या कौंटी क्रिकेटमध्ये एसेक्स या संघाकडून खेळत राहणार आहे.

यंदा चांगली कामगिरी नाही

येत्या ७ ते ११ सप्टेंबर दरम्यान कूक ओव्हल येथे शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. भारत विरुध्द इंग्लंडच्या या मालिकेत आतापर्यंत झालेल्या चारही कसोटी सामन्यांमध्ये कूकने चांगली कामगिरी केलेली नाही. या चार सामन्यांमध्ये कूकने अवघ्या १६ च्या सरासरीने एकूण १०९ धावा केल्या आहेत.

इंग्लंडचा सर्वोत्कृष्ट बॅट्समन

३३ वर्षीय अॅलिस्टर कूक हा इंग्लंडचा सर्वाधिक कसोटी धावा करणारा बॅट्समन आहे. त्याने १२ वर्षांच्या कसोटी कारकिर्दित ४४.४८ च्या सरासरीने १२ हजार २५४ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावांच्या यादीमध्ये कूक ६ व्या क्रमांकावर आहे. जर त्याने आपल्या शेवटच्या कसोटीत १४६ धावा केल्या तर तो या यादीत पाचव्या स्थानी जाईल. श्रीलंकेचा महान बॅट्समन कुमार संगकारा १२ हजार ४०० धावांसह या यादीत पाचव्या स्थानी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कूकचा सर्वाधिक स्कोर २९४ आहे. त्याने ही खेळी २०११ मध्ये भारताविरुद्ध बर्मिंगहॅम येथे केली होती.

First Published on: September 3, 2018 10:28 PM
Exit mobile version