San Diego Open 2021 : एंडी मरेची विजयी कमबॅकने सुरूवात

San Diego Open 2021 : एंडी मरेची विजयी कमबॅकने सुरूवात

माजी वर्ल्ड नंबर ब्रिटनच्या एंडी मरेने अमेरिकेच्या डेनिस कुडलाचा ६-३, ६-२ असा पहिल्याच फेरीत सॅन डायगो ओपनमध्ये पराभव केला. दोन शस्त्रक्रिया तसेच अनेक दुखापतींमधून एंडी मरेने कमबॅक केला आहे. आपल्या जुन्या फॉर्ममध्ये येण्याचा प्रयत्न मुरेकडून सुरू आहे. ३४ वर्षीय मुरेने आतापर्यंत तीनवेळा ग्रॅंड स्लॅम चॅम्पिअनशीप जिंकले आहेत. तर दोनवेळा ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट राहिले आहेत. मुरे सध्या १०९ व्या क्रमावर आहे.

ही लढत चांगली होती. अमेरिकन ओपनसारखीच स्पर्धा वाटली. मला आजच्या खेळामुळे चांगल वाटतय, पण मला आणखी रॅकिंगच्या खेळाडूंना पराभूत करायचे आहे, असेही मुरेने म्हटले आहे. आजच्या सामन्यानंतर मुरेची स्पर्धा ही नॉर्वेच्या कॅस्पर रूडसोबत आहे. या खेळाडूने लॅव्हर कप जिंकून देण्यात मदत केली होती.

नुकत्याच झालेल्या सामन्यात मला चांगल्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मला खात्री वाटते की आणखी चांगल्या खेळाडूंना येत्या काळातही हरवू शकतो. मला सध्या मिळणाऱ्या संधी विजयात बदलण्याची गरज वाटते. अशीच काहीशी संधी आता रूडच्या निमित्ताने मिळणार आहे. मुरेची यंदाच्या टूर्नामेंटमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री आहे. ओपन सर्कीट एशियाचा सामना कोरोनामुळे रद्द झाला होती.


हेही वाचा – AUS-W vs IND-W D/N Test 2021 : भारतीय संघाला मोठा झटका, फलंदाज हरमनप्रीत कौर पिंक-बॉल कसोटीतून बाहेर


 

First Published on: September 29, 2021 6:09 PM
Exit mobile version