घरक्रीडाAUS-W vs IND-W D/N Test 2021 : भारतीय संघाला मोठा झटका, फलंदाज...

AUS-W vs IND-W D/N Test 2021 : भारतीय संघाला मोठा झटका, फलंदाज हरमनप्रीत कौर पिंक-बॉल कसोटीतून बाहेर

Subscribe

हरमनप्रीत कौरच्या जागी पूनम राऊत अन्यथा युवा यास्तिका भाटियाला संधी देण्यात येण्याची शक्यता आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये गुरुवारी ३० सप्टेंबर रोजी पिंक-बॉल कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पिंक-बॉल कसोटी सामना खेळणार असून पहिल्यांदाच संघाला मोठा झटका बसला आहे. कारण भारतीय महिला टी-२० संघाची कर्णधार आणि कसोटी टीमची उपकर्णधार हरमनप्रीत कौर या ऐतिहासिक सामन्यातून बाहेर झाली आहे. अशी माहिती संघाची कर्णधार मिताली राजने दिली आहे. भारताची स्टार क्रिकेटपटू आणि उत्कृष्ट फलंदाज हरमनप्रीत कौरविनाच संघ पिंक-बॉल कसोटी खेळणार आहे. कर्णधार मिताली राजने सामन्याच्या पूर्वसंध्येला माहिती दिली की, हरमनप्रीतच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे तिन्ही एकदिवसीय कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही आणि आता कसोटीस समान्यातून बाहेर बसावे लागणार आहे. कौरच्या जागी कोणाला संधी देण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हरमनप्रीत कौरच्या जागी पूनम राऊत अन्यथा युवा यास्तिका भाटियाला संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. हरमनप्रीत कौर तीन सामन्यांच्या टी-२० आतरराष्ट्रीय सामन्यांपुर्वी संघात वापसी होण्याची शक्यता आहे. या सामन्याच्या मालिकेनंतर महिला बिग बॅश लीगसुद्धा खेळणार आहे. हरमनप्रीत कौरने मेलबर्न रेनेगेड्ससोबत यंदाच्या हंगामासाठी करार केला आहे. कौरच्या व्यतिरिक्त अनेक खेळाडू या सामन्यांत खेळताना दिसणार आहेत. परंतु हरमन कौर प्रीत पुर्णपणे बरी व्हावी अशी तिच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.

- Advertisement -

तब्बल १५ वर्षानंतर दोन्ही संघ कसोटीम सामन्यादरम्यान समोरा-समोर येतील. मिताली राजने दिलेल्या माहितीनुसार संघामध्ये सगळ्यात चांगला वेगवान गोलंदाज असला पाहिजे. झूलन गोस्वामीकडे चांगला अनुभव असून संघासाठी ती चांगली कामगिरी आहे. गुलाबी चेंडूच्या सामन्याबाबत मितालीने म्हटलं आहे की, प्रत्येकाला पिंक-बॉल कसोटीबाबत वेगळा अनुभव होता कारण कोणालाच गुलाबी चेंडूची सवय नव्हती. हा चेंडू थोडा फिरतो. यामुळे गुलाबी चेंडूची ही पहिली छाप पडली असल्याचे मितालीने म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : आमचा दसरा कडवट केल्यास मंत्र्यांची दिवाळी गोड होऊ देणार नाही – राजू शेट्टींचा इशारा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -