Viral Video : अर्जुन तेंडुलकरने छोट्या मुलाला रडवलं, नेमकं असं काय घडलं?

Viral Video : अर्जुन तेंडुलकरने छोट्या मुलाला रडवलं, नेमकं असं काय घडलं?

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएलचा २५ वा सामना पार पडला. यावेळी हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने आले होते. मुंबईने १४ धावांनी हैदराबादचा पराभव केला होता. त्यानंतर हा संघ जिंकून गुणतालिकेत २ क्रमांक पटकावला. मात्र, दुसऱ्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने शानदार गोलंदाजी करत आयपीएलमधील पहिले खाते उघडले. परंतु जेव्हा तो वेगवान गोलंदाजी करत होता तेव्हा हैदराबादचा एक चाहता स्टेडियममध्ये रडत होता. त्याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मुंबईने उत्कृष्ट फलंदाजीसोबत गोलंदाजीही केली. अर्जुनने या सामन्यात वेगवान गोलंदाजी केल्यामुळे त्याची गोलंदाजी शानदार ठरली होती. अर्जुनच्या गोलंदाजीमुळे हैदराबादचा पराभव झाल्यानंतर हैदराबादचा एक छोटा चाहता मैदानावर ढसाढसा रडू लागला. ज्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

हैदराबादला या सामन्यात शेवटच्या क्षणी २ चेंडूत १५ धावांची गरज होती. परंतु २० व्या ओव्हरमध्ये अर्जुनने उत्कृष्ट गोलंदाजी करत मुंबईला सामना जिंकून दिला. पण हैदराबादमधील मैदानावर त्यांच्याच घरी झालेल्या सामन्याच्या पराभवानंतर या चाहत्याव्यतिरिक्त लाखो लोकांची मनं दुखावली होती.

हैदराबाद गुणतालिकेत ९ व्या स्थानावर आहे. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, १९३ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेला हैदराबाद संघाचा सलामीवीर हॅरी ब्रूक स्वस्तात बाद झाला. मयांक अग्रवाल ४८ धावांची इनिंग खेळून बाद झाला. तर मयांकशिवाय सर्व फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केल्याने निकाल मुंबईच्या बाजूने लागला.


हेही वाचा : Sachin Tendulkar 50th Birthday: सचिन तेंडुलकरची हाफ सेन्चुरी, जाणून घ्या कसा ठरला ‘क्रिकेटचा देव’


 

First Published on: April 24, 2023 11:52 AM
Exit mobile version