घरक्रीडाSachin Tendulkar 50th Birthday: सचिन तेंडुलकरची हाफ सेन्चुरी, जाणून घ्या कसा ठरला...

Sachin Tendulkar 50th Birthday: सचिन तेंडुलकरची हाफ सेन्चुरी, जाणून घ्या कसा ठरला ‘क्रिकेटचा देव’

Subscribe

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज ५०वा वाढदिवस आहे. सचिनने आज आपल्या आयुष्याचं अर्धशतक पूर्ण केलंय. जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर…सचिनचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये मुंबईत झाला आणि बघता बघता हा मुलगा क्रिकेटचा देव ठरला. सचिनचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही अमूल्य योगदान आहे. त्यामुळे सचिनला संपूर्ण जगात क्रिकेटचा देव मानलं जातं. सचिनने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये असंख्य विक्रम रचले आहेत.

- Advertisement -

कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्याच्या बाबतीतही सचिन तेंडुलकर जगात पहिल्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३४ हजार ३५७ धावा केल्या आहेत.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन-गांगुली या जोडीच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी मिळून २४७ डावात १२ हजार ४०० धावा केल्या आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी मिळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३८ शतकांची भागीदारी करत, एक विश्वविक्रम केला आहे.

२५ एप्रिल १९९० ते २४ एप्रिल १९९८ पर्यंत सचिन तेंडुलकरने सलग २३९ सामन्यांमध्ये (५४ कसोटी आणि १८५ एकदिवसीय सामने) भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. एकाच देशासाठी सलग सामने खेळण्याचा हा विश्वविक्रम आहे.

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७६ वेळा (कसोटी-१५, एकदिवसीय-६२) सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे.

सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या नावावर संयुक्तपणे सर्वाधिक प्लेयर ऑफ द सिरीज पुरस्काराचा विक्रम आहे. दोन्ही खेळाडूंनी एकूण २०-२० वेळा प्लेयर ऑफ द सिरीजचा किताब पटकावला.

सचिन तेंडुलकरने वनडे वर्ल्ड कपमध्ये सहा शतकं झळकावली होती. विश्वचषकात सर्वाधिक शतकं ठोकण्याच्या बाबतीत सचिन भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या बरोबरीने पहिल्या क्रमांकावर आहे.


हेही वाचा : सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्ताने सुनील गावसकरांचे खास


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -