Asia Cup 2023 : यंदाही भारत-पाकिस्तान क्रिकेट युद्ध रंगणार; बीसीसीआयच्या जय शाहांची माहिती

Asia Cup 2023 : यंदाही भारत-पाकिस्तान क्रिकेट युद्ध रंगणार; बीसीसीआयच्या जय शाहांची माहिती

यंदाचे 2023 हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी अत्यंत व्यस्त आहे. कारण भारतीय संघाने नवीन वर्षाची सुरूवात मालिका खेळण्यापासूनच केली असून, पुढील काही महिने सामने सुरूच राहणार आहे. अशातच क्रिकेटप्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सप्टेंबरमध्ये आशिया चषक २०२३ (Asia Cup 2023) एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळला जाणार आहे. ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान संघ एकाच गटात असतील. तर दुसरा गट गतविजेता श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सप्टेंबरमध्ये भारत आणि पाकिस्तान क्रिकेट युद्ध पाहायला मिळणार आहे. (asia cup 2023 cricket schedule india and pakistan drawn in same preliminary group for 2023)

आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह (Jai Shah) यांनी 2023-2024 मध्ये होणाऱ्या स्पर्धांची यादी जाहीर केली आहे. या यादीत चाहत्यांची पहिली नजर पाकिस्तानात झालेल्या आशिया कप 2023 वर पडली. याबबात जय शाह यांनी ट्विट केले आहे. त्यानुसार, सप्टेंबरमध्ये आशिया चषक (Asia Cup 2023) एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळला जाणार आहे. ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान संघ एकाच गटात असतील. तर दुसरा गट गतविजेता श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जय शाह यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) स्पष्ट केले होते की, भारतीय संघ आशिया कपसाठी पाकिस्तानला जाणार नाही आणि स्पर्धा तटस्थ ठिकाणी हलवली जाणार आहे.

भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) या दोन्ही संघात 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरू झाली आहे. तर याच वर्षात आशिया चषक (Asia Cup 2023), एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup 2023) यासारख्या स्पर्धा होणार आहे.


हेही वाचा – ऋषभ पंतला पुढील उपचारासाठी मुंबईत आणणार, डीडीसीएच्या प्रमुखांची माहिती

First Published on: January 5, 2023 3:12 PM
Exit mobile version