ऋषभ पंतला पुढील उपचारासाठी मुंबईत आणणार, डीडीसीएच्या प्रमुखांची माहिती

भारतीय संघाचा यष्टिरक्षक ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला आहे. या कार अपघातानंतर ऋषभ पंतवर डेहराडूमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र आता पुढील उपचारांसाठी ऋषभला मुंबईत आणण्यात येणार आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) मोठा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघाचा यष्टिरक्षक ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला आहे. या कार अपघातानंतर ऋषभ पंतवर डेहराडूमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र आता पुढील उपचारांसाठी ऋषभला मुंबईत आणण्यात येणार आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) मोठा निर्णय घेतला आहे. डीडीसीए पंतला उपचारासाठी मुंबईला घेऊन जाणार असून, त्याच्या लिगामेंटच्या दुखापतीवर उपचार केले जाणार आहेत. (DDCA BCCI Will Take Rishabh Pant To Mumbai For Treatment Of Ligament Injury Rishabh Pant Accident)

काय म्हणाले डीडीसीएचे संचालक?

“क्रिकेटपटू ऋषभ पंत याला पुढील उपचारांसाठी आज मुंबईला हलवण्यात येणार आहे. 30 डिसेंबर रोजी झालेल्या कार अपघातानंतर पंत यांच्यावर डेहराडूनमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत”, अशी माहिती डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा यांनी दिली.

दुखापतीबाबत बीसीसीआयची अपडेट

“ऋषभ पंत याच्या डोक्यात दोन कट असल्याची माहिती बीसीसीआयने दिली होती. त्याच्या उजव्या गुडघ्यातील अस्थिबंधन फाटले असून उजव्या हाताच्या मनगटावर, घोट्याला, पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे. तसेच, त्याच्या पाठीवर जखम आहे. पंतची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. मात्र, आता बीसीसीआय आणि डीडीसीएने त्याच्यावर चांगले उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती बीसीसीआयने दिली.

ऋषभ पंत याच्या एमआरआय स्कॅन अहवालात कोणतीही अडचण आली नाही. अपघातानंतर बीसीसीआयने डीडीसीएला पंतच्या सतत संपर्कात राहून त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले होते. डीडीसीए प्रमुख श्याम शर्मा स्वतः पंतला भेटायला आले होते. याशिवाय उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हेही पंतला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते.


हेही वाचा – खून करा नाहीतर तुरुंगात टाका; संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान