Asian Games 2018 : सलामीच्या सामन्यात सायना पराभूत

Asian Games 2018 : सलामीच्या सामन्यात सायना पराभूत

फोटोसौजन्य- एनडीटीव्ही

इंडोनेशियात सुरू असलेल्या आशिया खेळांच्या दुसऱ्या दिवशी पहिल्यांदा सिंधूने विजय मिळवल्यानंतर भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालला मात्र पराभव पत्करावा लागला आहे. जपानच्या नोझुमी ओकुहाराने सायनाला २१-११, २३-२५, २१-१६ अशा सेट्समध्ये मात देत विजय मिळवला आहे. एकीकडे भारताच्या सिंधूने आपला पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर सायनाला मात्र पराभवाला सामोरं जाव लागला आहे.

असा झाला सामना

सायना आणि नोझुमी यांच्यातील सामन्यात नोझुमीने सुरूवातीपासूनच सामन्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. पहिल्या सेटमध्ये सायनाला चांगली कामगिरी करता आली नसल्यामुळे ओकुहाराने २१-११ च्या फरकाने पहिला सेट आपल्या नावे करत सामन्यात १-० ची आघाडी घेतली. ज्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये सायनाने सामन्यात पुनरागमन केले आणि सेट २५-२३ च्या फरकाने आपल्या नावे केला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये ओकुहाराने आपला खेळ उंचावत सेट २१-१६ च्या फरकाने जिंकत सामना आपल्या नावे केला.

वाचा – Asian Games 2018 : पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी

First Published on: August 20, 2018 10:50 AM
Exit mobile version