Video – जेंव्हा ‘ही’ भारतीय क्रिकेटर सिक्योरिटी सोबत नाच करते!

Video – जेंव्हा ‘ही’ भारतीय क्रिकेटर सिक्योरिटी सोबत नाच करते!

आयसीसी वूमन टी-२० वर्ल्ड कप २०२० भारत विरूद्ध न्युझीलंड च्या सामन्यात भारताने विजय मिळवला असताना, एका बाजूला ट्विटरवर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. आयसीसीच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केलाय हा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून हा नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे. भारतीय महिला संघाची खेळाडू जेमिमाह रॉड्रिगेस ही या व्हिडिओत सिक्योरीटी गार्डसोबत एका गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?

आयसीसीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये जेमिमाह ही एका महिला सिक्योरीटी गार्डसोबत ‘लव आज कल २’ या सिनेमातील गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. दोघीही या गाण्याचा आनंद घेत नाचत नाचत पुढे जात असल्याचे दिसत आहे. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान चा ‘लव आज कल २’ या चित्रपटातील हे गाण आहे. या व्हिडिओला युजर्सकडून चांगलीच पंसती मिळत आहे.

आयसीसीने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करत जेमिमाहला टॅग करून लिहीले आहे की, ‘#T20worldcup चालू असताना ऑफ ड्यूटी जेमिमाहचा सिक्योरिटीसोबत धमाकेदार नाच करताना’ , अशी कॅप्शन आयसीसीने दिले आहे. भारतीय महिला संघाने वूमन्स टी-२० च्या वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात जेतेपद पटकावले होते. भारताने प्रथम ऑस्ट्रेलियाचा नंतर बांगलादेशचा पराभव करून आता न्यूझीलंडवरही विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ३ धावांनी विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे.


हेही वाचा – भारताची विजयाची हॅट्रिक; न्यूझीलंडवर ३ धावांनी विजय


 

First Published on: February 27, 2020 2:20 PM
Exit mobile version