Asia Cup 2022साठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

Asia Cup 2022साठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

वेस्ट इंडिजच्या मालिकेनंतर बीसीसीआयने बहुप्रतिक्षित आशिया चषक 2022 च्या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. या १५ जणांच्या संघात केएल राहुल आणि माजी कर्णधार विराट कोहलीचं पुनरागमन झालं आहे. विराट कोहलीचा वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघात समावेश करण्यात आला नव्हता. तर केएल राहुल दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-२० मालिकेतून बाहेर होता. भारताचा सर्वोत्तम आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा देखील संघात समावेश करण्यात आलेला नाहीये. त्याच्या जागी आवेश खानला संघात संधी देण्यात आली आहे. बुमराह आणि हर्षल पटेल यांनी दुखापतीच्या कारणामुळे ते संघात समावेश होऊ शकले नाही.

आशिया चषक 2022 साठी निवडण्यात आलेल्या संघात दिनेश कार्तिकची त्याच्या चांगल्या कामिगिरीच्या जोरावर निवड करण्यात आली आहे. तर आर. अश्विनवर भारतीय संघ व्यवस्थापनाने विश्वास ठेवला होता. तसेच त्यालाही संघात स्थान देण्यात आले होते. वेस्ट इंडिज दौऱ्यावर चमकदार कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंगला तसेच प्लेअर ऑफ द सिरीजचाही संघात समावेश करण्यात आला आहे, तर फिरकीपटू रवी बिश्नोईलाही संघात स्थान देण्यात यश आले आहे.

आशिया कप 2022 साठी भारतीय क्रिकेट संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुडा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

बॅकअप खेळाडू – श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर.

28 ऑगस्टला होणार भारत-पाकिस्तान सामना

यावेळी आशिया कपचे आयोजन श्रीलंकेत होणार होते, मात्र तेथील परिस्थिती पाहता यूएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आशिया चषक स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होतील, ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ अ गटात पाकिस्तानसोबत असून भारताची मोहीम 28 ऑगस्टपासून पाकिस्तानविरुद्ध सुरू होणार आहे. आशिया चषक 27 ऑगस्टपासून सुरू होणार असून अंतिम सामना 11 सप्टेंबरला होणार आहे.


हेही वाचा : भारतीय हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव, रौप्य पदकावर मानावे लागले समाधान


 

First Published on: August 9, 2022 11:12 AM
Exit mobile version