Corona Effect : भारताच्या कुस्तीपटूंना बल्गेरियाला जाण्यापासून रोखले

Corona Effect : भारताच्या कुस्तीपटूंना बल्गेरियाला जाण्यापासून रोखले

भारताचा कुस्तीपटू सत्यवर्त कडियन

भारतामध्ये कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णाख्येंत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे काही देशांनी भारतासाठी आपली हवाई वाहतूक स्थगित केली आहे. हॉलंड सरकारने भारतीय नागरिकांना त्यांच्या देशात येण्यावर बंदी घातली आहे. याचाच परिणाम म्हणून भारताच्या दहा कुस्तीपटूंना सोफिया, बल्गेरियाला जाण्यापासून रोखण्यात आले. भारताचे हे कुस्तीपटू अंतिम ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत खेळणार असून ही स्पर्धा ६ ते ९ मे या कालावधीत पार पडणार आहे. हे कुस्तीपटू दिल्लीहून हॉलंडची राजधानी अ‍ॅमस्टरडॅमला जाणार होते आणि तेथून सोफियाला रवाना होणार होते.

विशेष विमानाचे आयोजन

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हॉलंडने भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांवर बंदी घातली आहे. त्यामुळे भारतीय कुस्तीपटूंची तिकिटे रद्द करण्यात आली. या कुस्तीपटूंमध्ये अमित धांकर (७४ किलो वजनी गट), सत्यवर्त कडियन (९७ किलो) आणि सुमी मलिक (१२५ किलो) या पुरुष कुस्तीपटूंसह सीमा (५० किलो), निशा (६८ किलो) आणि पूजा (७६ किलो) या महिला कुस्तीपटूंचा समावेश होता. परंतु, बुधवारी सकाळी भारताच्या कुस्तीपटूंसाठी विशेष विमानाचे आयोजन करण्यात आले.

First Published on: April 28, 2021 6:46 PM
Exit mobile version