ICC ODI Ranking: आयसीसी ODI क्रमवारीत बांगलादेश पाकिस्तानच्या एक पाऊल पुढे

ICC ODI Ranking: आयसीसी ODI क्रमवारीत बांगलादेश पाकिस्तानच्या एक पाऊल पुढे

आयसीसीने नुकताच एकदिवसीय क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. आयसीसीच्या नव्या एकदिवसीय क्रमवारीत बांगलादेश संघानं पाकिस्तानला मागे टाकलं आहे. बांगलादेशचा संघ या क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत बांगलादेशनं पाहुण्या संघाचा २-१ असा पराभव केला. या कामगिरीमुळे बांगलादेश संघानं आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत सहावं स्थान मिळवलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीत बांगलादेशने पाकिस्तानला मागे टाकून सहावं स्थान पटकावलं आहे. दरम्यान, २९ मार्च रोजी लाहोरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान पाकिस्तानला ८८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवामुळं पाकिस्तानचा संघ आयसीसी क्रमवारीत एका स्थानानं घसरून सातव्या क्रमांकावर गेला आहे.

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतील दोन्ही संघांच्या रेटिंग गुणांबद्दल बोलायचे झाले तर, दोघांचेही गुण ९३-९३ गुण आहेत. याचा अर्थ पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी ठरला तर तो बांगलादेशला पुन्हा मागे टाकु शकतो.

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीता

सध्याच्या आयसीसी ताज्या एकदिवसीय क्रमवारीनुसार, न्यूझीलंडचा संघ १२१ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तसंच, ११० गुण भारतीय संघ चौथ्या स्थानावर आहेय.


हेही वाचा – PAK vs AUS: पाकिस्तानचा सर्वात मोठा पराभव; ऑस्ट्रेलियाचा सलग पाचव्यांदा दणदणीत विजय

First Published on: March 30, 2022 1:03 PM
Exit mobile version