घरक्रीडाPAK vs AUS: पाकिस्तानचा सर्वात मोठा पराभव; ऑस्ट्रेलियाचा सलग पाचव्यांदा दणदणीत विजय

PAK vs AUS: पाकिस्तानचा सर्वात मोठा पराभव; ऑस्ट्रेलियाचा सलग पाचव्यांदा दणदणीत विजय

Subscribe

पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियांन आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. ऑस्ट्रलिया संघानं वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा ८८ धावांनी पराभव केला आहे. मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील पाकिस्तान संघाचा हा सर्वात मोठा पराभव असल्याची चर्चा आहे.

पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियांन आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. ऑस्ट्रलिया संघानं वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा ८८ धावांनी पराभव केला आहे. मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील पाकिस्तान संघाचा हा सर्वात मोठा पराभव असल्याची चर्चा आहे. या सामन्यात प्रथम खेळताना ऑस्ट्रेलियानं सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेड याच्या तुफानी शतकी खेळीच्या जोरावर ७ बाद ३१३ धावा केल्या. या धावांचा पाढलाग करताना पाकिस्तान संघ २२५ धावांतच तंबूत परतला. त्यामुळं ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियानं उभं केलेल्या ३१३ धावांच आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामी जोडीनं चांगली सुरूवात केली. संघाची धावसंख्या एक गडी बाद १२० वर नेली होती. यानंतर पुढील १०५ धावा करताना पाकिस्तानच्या संघाला गळती लागली आणि अवघा संघ तंबुत परतला. या सामन्यात सलामीवीर फलंदाज फखर झमान १८ चेंडूत १८ धावा करून सीन अबंटच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला इमाम-उल-हक आणि कर्णधार बाबर आझम यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली.

- Advertisement -

मात्र बाबर ही ७२ चेंडूत ६ चौकार मारत ५७ धावा करून बाद झाला. त्याला फिरकीरटू स्विपसनने बाद केले. फिरकीरटू अॅडम झाम्पाने मधल्या षटकांमध्ये तगडी गोलंदाजी करत पाकिस्तानच्या फलंदाजांना धावा करू दिल्या नाहीत. सलामीवीर फलंदाज इमाम उल हक एका बाजूला राहिला. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. इमामनं ९६ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकार मारत १०३ धावा केल्या.

पाकिस्तानची सलामी जोडी आणि इमाम वगळता ६ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. संपूर्ण संघ ४५.२ षटकात २२५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. झाम्पाने १० षटकात ३८ धावा देत ४ बळी घेतले. स्विपसन आणि ट्रॅव्हिस हेडने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

- Advertisement -

या विजयानंतर ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. याआधी त्याने कसोटी मालिकाही १-० अशी खिशात घातली होती. ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर सलग पाचव्या वनडेत पाकिस्तानचा पराभव केला.


हेही वाचा – Pak Vs Aus 1st ODI : ऑस्ट्रेलियन संघाच्या अडचणीत वाढ, कोरोना, दुखापतीने खेळाडू हैराण

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -