राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोत भारताच्या सुशीला देवीने पटकावले रौप्यपदक

राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोत भारताच्या सुशीला देवीने पटकावले रौप्यपदक

बर्मिंगहममध्ये सुरु राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. ज्युदो खेळातही भारताने दोन पदकांना गवसणी घातली आहे. सुशीला देवी लिकमाबम हीने महिलांच्या 48 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे. अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या मायकेला व्हाइटबूईने तिला मात दिल्यामुळे सुशीलाचे सुवर्णपदक निसटले. तसेच, विजय कुमार याने 60 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले. (cwg 2022 shushila devi wins silver 48kg judo womens singles first time silver medal in judo)

सुशीला देवीने ज्युदोमध्ये रौप्य मिळवले असून विजयकुमारनेही कांस्य पदक मिळवले. त्यामुळे भारताची पदकसंख्या 8 वर गेली आहे. त्याआधी भारताने वेटलिफ्टिंगमध्ये तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवले आहे. शिवाय, लॉन बाऊल्समध्येही भारतीय महिलांचा ग्रुप अंतिम सामन्यात पोहोचल्याने किमान रौप्यपगक भारताने निश्चित केले आहे. या पदकासह भारताच्या खात्यावर 9 पदके झाली असून हे नववे पदक सुवर्ण असेल की रौप्य हे पाहावे लागणार आहे.

याआधी 2014 साली पार पडलेल्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत देखील सुशीला देवीने रौप्यपदक मिळवले होते. त्यानंतर आताही इतिहासाची पुनरावृत्ती करत सुशीलाने बर्मिंगहम कॉमनवेल्थ खेळांमध्ये रौप्य पदक मिळवले आहे. सुशीलाने अंतिम सामन्यात कडवी झुंज दिली.


हेही वाचा – २०१८ सालच्या ‘त्या’ प्रकरणात हार्दिक पांड्याला क्लीन चिट

First Published on: August 1, 2022 11:52 PM
Exit mobile version