T20 World Cup 2021: धोनी संघासोबत असणे हा सर्वोत्तम निर्णय- मायकल वॉन

T20 World Cup 2021: धोनी संघासोबत असणे हा सर्वोत्तम निर्णय- मायकल वॉन

भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीला नुकतीच भारतीय संघाच्या टी २० विश्वचषकाच्या मेंटॉर पदाची जबाबदारी देण्यात आली. आगामी कालावधीत १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत युएई आणि ओमान येथे हे सामने पार पडणार आहेत. धोनीला मेंटॉर पदाची जबाबदारी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. धोनीने २०१९ साली शेवटचा आयसीसी वर्ल्ड कपचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. सध्या युएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रमिअर लिगच्या २०२१ च्या मालिकेसाठी धोनीकडे चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद आहे. इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकल वॉनने धोनी संघासोबत असणे हे टीमसाठी फायद्याचेच असेल असे मत व्यक्त केले आहे.

नुकत्याच आरसीबीसोबत खेळल्या गेलेल्या सामन्यात धोनीने वापरलेल्या क्ल्युप्त्यांचा फायदा संघाला झाला होता असेही वॉनने म्हटले आहे. धोनीने या सामन्यामध्ये सीएसकेमधील फलंदाजीचा क्रम गोलंदाजीचा अंदाज घेऊन निश्चित केला. या सामन्यात मॅक्सवेल गोलंदाजीला येणार असल्याचा अंदाज आल्यानेच या सामन्यात धोनीने राईट हॅण्डेड बॅट्समनला फलंदाजीला पाठवले. त्यामुळे संघात असलेल्या खेळाडूंच्या उपलब्धततेमुळेच सीएसकेला याचा फायदा झाला, असे वॉनने म्हटले आहे.

धोनीला टी २० संघासाठीचे मेंटॉर म्हणून नेमण्याचा निर्णय हा अतिशय महान असा निर्णय आहे. भारताकडे टी २० सामन्याच्या फॉरमॅटमधील सर्वात महान असा टी २० संघाचा माजी कर्णधार आहे. त्यामुळे टी २० संघासाठी नेमण्याचा निर्णय हा अतिशय योग्य असा आहे. म्हणूनच एखाद्या संघाला धोनीसारखा कर्णधार मेंटॉर म्हणून का लाभू नये ? हा सर्वात उत्तम निर्णय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

धोनीसारख्या खेळाडूची हुशारी, बुद्धीमत्ता ही तुमच्या डगआऊटमध्ये तसेच ट्रेनिंगच्या ठिकाणी असायला हवी. कोणताही अतिरिक्त विचार न करता धोनी या गोष्टी नैसर्गिक पद्धतीने करतो. त्यामुळेच जवळपास ९५ टक्के वेळा धोनीचा निर्णय अचूक असतो. म्हणूनच तो मास्टर असल्याचेही वॉनने म्हटले आहे.


हेही वाचा – T20 World cup : धोनीचा मिडास टच भारतीय संघासाठी लकी ठरेल – फारूख इंजिनिअर


 

First Published on: September 27, 2021 5:22 PM
Exit mobile version