जेव्हा मी क्रीजवर पोहोचलो तेव्हा..,चौथ्या टी-२० मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर दिनेश कार्तिकची प्रतिक्रिया

जेव्हा मी क्रीजवर पोहोचलो तेव्हा..,चौथ्या टी-२० मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर दिनेश कार्तिकची प्रतिक्रिया

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चौथ्या टी-२० मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणारा दिनेश कार्तिक प्लेअर ऑफ द मॅच ठरला आहे. या सामन्यामध्ये कार्तिकने पहिलं अर्धशतक झळकावलं आहे. २७ चेंडूत ५५ धावांच्या खेळीवर टीम इंडियाने सन्मानजनक धावसंख्या गाठली आहे. तब्बल १६ वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिनेश कार्तिकने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

मी या सेटअपमध्ये स्वत:ला खूप सुरक्षित मानतो. शेवटच्या सामन्यात माझ्यासाठी काही गोष्टी चांगल्या ठरलेल्या नाहीयेत. परंतु जेव्हा मी ड्रेसिंग रूममध्ये परतलो, तेव्ही मी स्वत:ला सुरक्षित समजले आहे. मी आता चांगल्या पद्धतीने विचार करू शकतो. हे सर्व नियोजन आणि अनुभवातून समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होते. आमचे सलामीवीर धावा करू शकले नाहीत. जेव्हा मी क्रीजवर पोहोचलो तेव्हा हार्दिक पांड्याने मला क्रीजवर थोडा वेळ घालवण्याचा सल्ला दिला. त्यावेळी काही निर्णय आमच्यासाठी योग्य ठरले आहे, असं दिनेश कार्तिक म्हणाला.

कार्तिक पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याचा १ डिसेंबर २००६ साली भाग होता. त्यानं जोहान्सबर्गमध्येच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ज्यामध्ये त्यानं २८ चेंडूत नाबाद ३१ धावांची खेळी केली होती. परंतु १६ वर्षांनंतर कार्तिकने पहिले आणि सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केलं आहे.

दरम्यान, दिनेश कार्तिकने २०२२ आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली. आयपीएलमधील विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर कार्तिकने पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये पुनरागमन केलं आहे.


हेही वाचा : वनडे सामन्यात गल्ली क्रिकेटचे वातावरण, बॉल शोधण्यासाठी खेळाडू-कॅमेरामन थेट झाडात


 

First Published on: June 18, 2022 5:27 PM
Exit mobile version