US OPEN 2018 : जोकोविच सलग अकराव्यांदा उपांत्य फेरीत

US OPEN 2018 : जोकोविच सलग अकराव्यांदा उपांत्य फेरीत

सौजन्य - The National

१३ वेळा ग्रँड स्लॅम विजेता नोवाक जोकोविचने अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याने ऑस्ट्रलियान जॉन मिलमनचा ६-३, ६-४, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. त्यामुळे जोकोविचचे तिसऱ्यांदा अमेरिकन ओपन जिंकण्याच्या आशा अजूनही कायम आहेत. उपांत्य फेरीत त्याचा सामना जपानच्या काई निशिकोरी याच्याशी होईल.

कसा झाला सामना 

उपांत्य फेरीच्या या सामन्यात नोवाक जोकोविचने अप्रतिम सुरूवात केली. त्याने या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये जोकोविचकडे ४-१ अशी आघाडी मिळवली होती. यातून पुनरागमन करणे मिलमनला शक्य झाले नाही. त्यामुळे त्याने हा पहिला सेट ६-३ असा गमावला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये मिलमनने सामन्यात परत येण्याचा प्रयत्न केला. पण जोकोविचनेही योग्य वेळी आपला खेळ उंचावत हा सामना जिंकला.

उपांत्य फेरीत निशिकोरीशी सामना 

अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीत जोकोविचचा सामना जपानच्या काई निशिकोरीशी होईल. निशिकोरीने उपांत्यपूर्व फेरीतील चुरशीच्या सामन्यात मरीन चिलीचचा २-६, ६-४, ७-६, ४-६, ६-४ असा पराभव केला. निशिकोरी याआधी २०१४ मध्ये अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात खेळला होता.
First Published on: September 6, 2018 5:48 PM
Exit mobile version