वनडे सामन्यात गल्ली क्रिकेटचे वातावरण, बॉल शोधण्यासाठी खेळाडू-कॅमेरामन थेट झाडात

वनडे सामन्यात गल्ली क्रिकेटचे वातावरण, बॉल शोधण्यासाठी खेळाडू-कॅमेरामन थेट झाडात

आपण इमारतीच्या आवारात अथवा एका गल्लीत क्रिकेट (Cricket) खेळत असताना आपला चेंडू (Ball) कोणत्यातरी कोपऱ्यात गेला तर, तो शोधण्यासाठी सर्व खेळाडू आपली शोधमोहीम सुरू करतात. एकच चेंडू आणि क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी हे खेळाडू चेंडू शोधत असतात. मात्र अशीच घटना एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात घडली आहे. ऐकायला थोडे नवल वाटते. पण हो… अशी घटना इंग्लंड आणि नेदरलँड्स  (England and Nederlands) यांच्यात झालेल्या सामन्यावेळी घडली. एम्स्टेल्विनमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यावेळी ग्राऊंड स्टाफ (Ground Staff) आणि ब्रॉडकास्टिंग टीमही (Broadcasting team) बॉल शोधण्यासाठी झाडामध्ये गेले. (England vs Netherlands odi gully cricket scenes at international cricket watch video)

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इंग्लंड आणि नेदरलँड्स यांच्यातील पहिल्या वनडेमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना इंग्लंडचा सलामीवीर डेव्हिड मलान याने सामन्याच्या ९ व्या षटकात पीटर सिलारच्या गोलंदाजीवर मारलेला षटकार मैदानाबाहेर गेला. हो षटकार इतका लांब मारला होता की थेट चेंडू झाडांमध्ये गेला.

हेही वाचा – इंग्लंडचा विश्वविक्रम, वनडे सामन्यात केल्या ४९८ धावा

त्यानंतर लगेचच नेदरलँड्सचे काही खेळाडू, सपोर्ट स्टाफ बॉल शोधण्यासाठी झाडांमध्ये गेले. बरेच प्रयत्न केल्यानंतरही त्यांना बॉल सापडला नाही, त्यामुळे ब्रॉडकास्टिंग टीममधला कॅमेरामनही त्यांच्या मदतीला गेला. यानंतर त्यांना बॉल मिळाला. बॉल मिळाल्यानंतर स्टेडियममध्ये एकच जल्लोष करण्यात आला.


हेही वाचा – ११ वर्षीय दीपाची ऑलिम्पियाडसाठी निवड, मोदींना देणार योगाचे धडे

First Published on: June 18, 2022 3:00 PM
Exit mobile version