फखर जमानने झळकावले पाकिस्तानसाठी पहिले द्विशतक

फखर जमानने झळकावले पाकिस्तानसाठी पहिले द्विशतक

फखर जमान

पाकिस्तानचा डावखुरा बॅट्समन फखर जमानने झिम्बाब्वेविरूद्ध द्विशतक झळकावले असून एकदिवसीय सामन्यात २०० धावा करणारा फखर पाकिस्तानचा पहिला तर जगातील सहावा बॅट्समन ठरला आहे. झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या पाच दिवसांच्या एकदिवसीय मालिकेतील शुक्रवारी झालेल्या चौथ्या सामन्यात फखरने हे अप्रतिम द्विशतक झळकावले आहे. फखरने नाबाद २१० धावा केल्या असून त्याच्या या द्विशतकाच्या जोरावर पाकिस्तानने ३९९ वर १ बाद असा मोठा स्कोअर उभा केला. विशेष म्हणजे ३९९ हा पाकिस्तानचा आतापर्यंतचा सर्वात मोठा स्कोअर असून याआधी ३८५ हा त्यांचा सर्वोच्च स्कोअर होता जो त्यांनी २१ जानेवारी २०१० रोजी बांग्लादेशविरूद्ध केला होता.

फखरने मोडला २२ वर्षांपूर्वीचा पाकिस्तानचा रेकॉर्ड

फखर जमानने आपल्या वन-डे करिअरमधील तिसरे तर मालिकेतील दुसरे शतक झळकावले असून त्याने १५६ बॉलमध्ये २४ फोर्स आणि ५ सिक्ससह नाबाद २१० धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे हा कोणत्याही पाकिस्तानी बॅट्समनकडून करण्यात आलेला सर्वाधिक स्कोअर असून याआधी २२ वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या सईद अन्वरने १९९६ मध्ये चेन्नई येथे १९४ धावांची खेळी खेळली होती. सईदने ही खेळी भारताविरूद्ध केली होती.

सईद अन्वर

पाकिस्तानने सर्वात मोठ्या पार्टनरशिपचा रेकॉर्डही तोडला

झिम्बाब्वेविरूद्ध फखरने झळकावलेल्या अप्रतिम २१० धावांच्या खेळीला इमाम-उल-हकची उत्तम साथ मिळाली असून त्याने ११३ धावा करत अप्रतिम शतक झळकावले आहे. दोघांच्या या अप्रतिम खेळीमुळे त्यांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल ३०४ धावांची भागिदारी केली. ही जगातील सर्वात मोठी भागीदारी ठरली असून याआधीचा श्रीलंकेच्या सनथ जयसूर्या आणि उपल थरंगा यांचा २८६ धावांचा रेकॉर्ड पाकिस्तानने तोडला आहे.

फोटो सौजन्य- टाईम्स नाउ

यांनीही केले आहे याआधी द्विशतक

एकदिवसीय सामन्यात २०० धावा करणारा फखर पाकिस्तानचा पहिला तर जगातील सहावा बॅट्समन ठरला आहे. याआधी सर्वात पहिले द्विशतक सचिन तेंडुलकरने २०१० मध्ये साउथ अफ्रिकेविरूद्ध झळकावले होते त्याने नाबाद २०० धावांची खेळी केली होती. त्यानंतर भारताच्या रोहित शर्मा, विरेंद्र सेहवाग, वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल आणि न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलनंही द्विशतक झळकावले आहे. यासर्वांत रोहित शर्माने तीन वेळा, सेहवागने दोन वेळा तर इतरांनी एक वेळा द्विशतक झळकावले आहे.

एकदिवसीय सामन्यात द्विशतक करणारे बॅट्समन
First Published on: July 20, 2018 8:51 PM
Exit mobile version