Gujarat Titans IPL 2022: राजस्थानवर मात करत गुजरात टायटन्सची अंतिम फेरीत धडक, संघाकडून नवा रेकॉर्ड

Gujarat Titans IPL 2022: राजस्थानवर मात करत गुजरात टायटन्सची अंतिम फेरीत धडक, संघाकडून नवा रेकॉर्ड

आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या १५ व्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना (First qualifier match) गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यामध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. त्यानंतर या संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. गुजरातने अंतिम फेरीत स्थान मिळवून एक खास विक्रम केला आहे. हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील संघ हा आयपीएल पदार्पणाच्या हंगामात अंतिम फेरीत धडक मारणारा तिसरा संघ ठरला आहे. गुजरातपूर्वी फक्त दोन संघांनी अशाप्रकारची उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

राजस्थानने प्रथम फलंदाजी करत पहिल्या क्वालिफायरमध्ये १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १९.३ षटकांत ३ गडी गमावून सामना जिंकला. गुजरातकडून डेव्हिड मिलरने फटाक्यांची आतषबाजी केली. त्याने ३८ चेंडूत ५ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ६८ अशा नाबाद धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने ४० नाबाद धावा केल्या. अशाप्रकारे गुजरातने हा सामना ७ गडी राखून अंतिम फेरीत धडक मारली आहे.

गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ मधील १५ व्या हंगामात अंतिम फेरीत स्थान मिळवून एक विशेष विक्रम केला. अंतिम फेरीत स्थान गाठणारा गुजरात हा तिसरा संघ ठरला आहे. गुजरातच्या आधी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांनी हे चमत्कार केले आहेत. चेन्नई आणि राजस्थान यांनी आयपीएल २००८ च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. विशेष म्हणजे, IPL 2022 च्या फायनलमध्ये पोहोचणारा गुजरात हा पहिला संघ आहे. या संघाने १४ लीग सामन्यांपैकी १० सामने जिंकले आणि ४ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला.

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२२ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम खेळून गुजरात टायटन्सला १८९ धावांचे लक्ष्य दिले. राजस्थान रॉयल्सकडून सलामीवीर जॉस बटलरने ५६ चेंडूत ८९ धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याने १२ चौकार आणि २ षट्कार लागवले. बटलरच्या स्फोटक खेळीमुळे राजस्थानने २० षटकांत ६ बाद १८८ धावा केल्या.


हेही वाचा : ABD is back : एबी डिव्हिलियर्स आरसीबीच्या संघात करणार पुनरागमन


 

First Published on: May 25, 2022 4:32 PM
Exit mobile version