स्मिथ म्हणतो ‘या’ भारतीय गोलंदाजाला भारतात खेळणं कठीण!

स्मिथ म्हणतो ‘या’ भारतीय गोलंदाजाला भारतात खेळणं कठीण!

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगात सर्वच देश लॉकडाऊन आहेत. यामुळे सर्व खेळाडू सोशल मिडीयावर आपला वेळ घालवत आहेत. कसोटी क्रमवारीत अव्वल असलेला स्टिव्ह स्मिथ आणि न्यूझलंडचा फिरकीपटू इश सोधी यांनी नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये गप्पा मारल्या. यावेळी स्मिथने भारतात एकच गोलंदाज आहे ज्याला खेळणं कठीण आहे असा खुलासा केला. यावेळी त्याने भारतीय संघाचं कौतुक केलं.

“डावखूरा फिरकीपटू रविंद्र जडेजाला भारतामध्ये खेळणं अत्यंत कठीण आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करत असताना त्याचा चेंडू कधी अनपेक्षितपणे वळतो तर कधी वेगाने निघून जातो. गुड लेंथवर टप्पा ठेवत फलंदाजाला फसवण्यात तो तरबेज आहे. त्याने हे सातत्य कायम राखल्यामुळे त्याला खेळणं कठीण होऊन बसत आहे. जडेजासारखे गोलंदाज जेव्हा चेंडूची गती कमी-जास्त करतात त्यावेळी त्यांना खेळणं कठीण असतं. फार कमी गोलंदाजांना अशी गोलंदाजी करायला जमतं. रविंद्र जडेजा हा त्यांच्यापैकी एक आहे.” असं स्टिव्ह स्मिथ म्हणाला.


हेही वाचा – अफगाणिस्तान १०० तालिबान कैद्यांना सोडणार

दरम्यान, स्टिव्ह स्मिथने भारतीय संघाचंही कौतुक केलं. “ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणून आम्हाला नेहमी अ‍ॅशेल मालिका आमच्यासाठी मोठी वाटते. पण सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ अव्वल आहे. तसंच भारतात कसोटी क्रिकेट खेळणं किती अवघड आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने भारतात भारताला हरवून कसोटी मालिका जिंकणं हे चित्र पहायला मला आवडेल,” असं स्मिथ म्हणाला.

 

First Published on: April 8, 2020 4:29 PM
Exit mobile version