न्यूझीलंड दौऱ्यात रुम नसल्याने धोनी माझ्यासाठी जमिनीवर झोपला; मुलाखतीत पांड्याने सांगितली इनसाईड स्टोरी

न्यूझीलंड दौऱ्यात रुम नसल्याने धोनी माझ्यासाठी जमिनीवर झोपला; मुलाखतीत पांड्याने सांगितली इनसाईड स्टोरी

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी बद्दल अनेक खुलासे केले आहेत. माझ्या यशात धोनीची भूमिका महत्वाची असून तो माझा भाऊ आणि माझा लाईफ कोच आहे, असे हार्दिक पांड्याने एका मुलाखतीत म्हटले आहे. धोनी एकमेव व्यक्ती आहे जो त्याच्या भावना समजून घेतो, असे देखील पांड्या म्हणाला. २०१६ मध्ये हार्दिकने धोनीच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. धोनीच्या विश्वासामुळे त्याला एक चांगला अष्टपैलू म्हणून ओळख मिळाली आहे.

हार्दिक पांड्याने मुलाखतीत अनेक इनसाईड स्टोरीज सांगितल्या आहेत. धोनी मला खूप जवळून ओळखतो. तो एकमेव व्यक्ती आहे जो मला शांत करु शकतो. तसेच, हार्दिक पांड्याने जानेवारी २०१९ ची एक घटना सांगितली, जेव्हा एका टीव्ही शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल त्याला आणि केएल राहुलला निलंबित करण्यात आले होते. तपासानंतर त्याच्यावरील लादलेली बंदी उठवण्यात आली. यानंतर पंड्याला न्यूझीलंड दौऱ्यावर पाठवण्यात आले. मात्र, दरम्यानच्या या कठिण काळात धोनीने मदत केली, असे पांड्याने सांगितले.

धोनी हा असा व्यक्ती आहे, जो मला सुरुवातीपासून चांगल्या पद्धतीने ओळखतो. मी कसा आहे, मला काय आवडत नाही, हे सर्व त्याला माहिती आहे. जानेवारी २०१९ मध्ये बंदी उठवल्यानंतर जेव्हा मला न्यूझीलंडला पाठवण्यात आले तेव्हा सुरुवातीला माझ्यासाठी हॉटेलमध्ये जागा नव्हती. नंतर मला फोन आला की धोनीने माझ्यासाठी खोलीची व्यवस्था केली आहे. तो नेहमीच माझ्या मदतीसाठी तयार असतो, असे धोनीने सांगितले.

माझ्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मला त्याच्याच मदतीची गरज भासली. त्याने कारकिर्दीमध्ये अनेकदा मला मदत केली आहे. तो मला भावासारखा आहे. जेव्हा मला गरज होती तेव्हा त्याने मला मदत केली. त्याचा मी आदर करतो, असे हार्दिक म्हणाला. पुढे बोलताना आमच्यात नेहमी चर्चा होते. मी नेहमी त्याच्याकडून सल्ला घेतो. त्याच्यासोबत राहून तुम्ही परिपक्व होता. तसेच नम्र राहण्यास शिकता. मी त्याला पाहून खूप काही शिकलो आहे. तो कधीही संयम सोडत नाही, असे गौरवोद्गार हार्दिक पांड्याने धोनीबाबत काढले.

हार्दिक पांड्याचा सध्या क्रिकेटमधील सर्वात खराब काळ सुरू आहे. या आयपीएलमध्ये त्याची बॅट शांत होती. तसेच त्याने यूएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये एकदाही गोलंदाजी केलेली नाही.

 

First Published on: October 18, 2021 6:31 PM
Exit mobile version