राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने रचला इतिहास

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने रचला इतिहास

हरमनप्रीत कौर

२२ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरूवात थाटामाटात झाली. या स्पर्धेच्या सुरूवातीलाच भारतीय खेळाडूंनी चांगली सुरूवात केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अर्धशतक झळकावले आहे. विशेष म्हणजे हरमनप्रीत कौर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अर्धशतक झळकावणारी पहिली खेळाडू ठरली आहे.

ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक एलिसा हिली हिने या सामन्यात मोठा विक्रम केला. एलिसाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये यष्टिंमागे १०० बळी टिपण्याचा पराक्रम करत भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) विक्रम मोडला. या फॉरमॅटमध्ये १०० बळी घेणारी ती पहिली खेळाडू ठरली.

दरम्यान, भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधना (२४) व शेफाली यांनी चांगली सुरूवात करून दिली. मात्र, डार्सिए ब्राऊनने ही जोडी तोडली. जेमिमान रॉड्रिक्सही ११ धावा करून बाद झाली. शेफाली ३३ चेंडूंत ९ चौकारांसह ४८ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने मोर्चा सांभाळला आणि इतिहास घडवला. हरमनप्रीतने ३४ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ५२ धावा केल्या. मिगन शटने तिची विकेट घेतली. भारताने ८ बाद १५४ धावा केल्या.


हेही वाचा – बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल खेळाला झाली सुरुवात, पीव्ही सिंधूने भारतीय दलाचे केले नेतृत्व

First Published on: July 29, 2022 6:01 PM
Exit mobile version