Tokyo Paralympics: हात नसतानाही उंच कामगिरी, निषाद कुमारला हाय जंपसाठी सिल्वर मेडल

Tokyo Paralympics: हात नसतानाही उंच कामगिरी, निषाद कुमारला हाय जंपसाठी सिल्वर मेडल

Tokyo Paralympics: हात नसतानाही उंच कामगिरी, निषाद कुमारला हाय जंपसाठी सिल्वर मेडल

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) निषाद कुमारने (Nishad Kumar) पहिले हिमाचलच्या (Himachal) खात्यात पहिले मेडेल मिळवले आहे. पुरुष उंच उडी टी-४७ कॅटेगिरीत निषाद कुमारने सिल्वर मेडल मिळवले आहे. (Himachal Nishad Kumar wins silver medal for high jump in Tokyo Paralympics) निषादने राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त  महत्त्वाची कामगिरी बजावत देशाला सिल्वर मेडल मिळवून दिले. निषादने हिमाचलसोबतच भारताचे नाव देखील उंचावले. एक हात नसताना निषादने महत्त्वाची कामगिरी केली. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला मिळालेले हे दुसरे पदक आहे. निषाद कुमारने टी-४७ कॅटेगिरीमध्ये २.०९ मीटर उडी घेऊन दुसरे स्थान पटकावले. निषादने याच वर्षी दुबईमध्ये झालेल्या फाजा विश्व पॅरा एथलँटिक्स ग्रा प्रीमध्ये उंच उडी टी-४७ कॅटेगिरीमध्ये गोल्ड मेडल मिळवले होते.

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवणारा २२ वर्षांचा निषाद कुमार हा हिमाचल प्रदेशच्या ऊना जिल्ह्याच्या अंब या छोट्या गावात राहणार आहे. निषादची पहिली सुरुवात बंगळूरु कोचिंग कँपमध्ये झाली. निषादचे वडिल रशपाल राज हे शेतकरी आहेत. तर त्याची आई पुष्पा देवी गृहिणी आहे. निषादला एक मोठी बहिण असून ती बी कॉमचे शिक्षण घेत आहे. निषादला लहानपणापासून खेळाची आवड होती. निषाद पाचवीत असल्यापासूनच त्याने उंची उडी मारण्याची प्रॅक्टिस सुरू केली होती. निशादने हिमाचलमध्येच दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

निषाद केवळ ८ वर्षांचा असताना त्याने त्याचा एक हात गमावला. निषादने वडिल एक शेतकरी आहे त्यांच्या शेतात गवत कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनमध्ये निषादचा हात गेल्याने  निषादने त्याचा उजवा हात गमवावा लागला. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत निषादला कोरोनाची लागण देखील झाली होती. मात्र निषाद लवकर बरा झाला आणि पुन्हा नव्याने तयारीला लागला.


हेही वाचा – Tokyo Paralympics : क्रीडा दिनी पॅरालिम्पिकमध्ये भारताची दमदार कामगिरी, पदकांची हॅटट्रिक!

First Published on: August 30, 2021 10:56 AM
Exit mobile version