ENG VS IND 4TH TEST: उमेश यादव, शार्दुल ठाकुरचा भारतीय संघात समावेश

ENG VS IND 4TH TEST: उमेश यादव, शार्दुल ठाकुरचा भारतीय संघात समावेश

ENG VS IND 4TH TEST: उमेश यादव, शार्दुल ठाकुरचा भारतीय संघात समावेश

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये कसोटी मालिकेचा चौथा सामना आज लंडनच्या ओवल मैदानात खेळत असताना इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय स्वीकारला असून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. तर भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. ते दोन्ही बदल वेगवान गोलंदाजांमध्ये करण्यात आलेत इशांत शर्मा आणि शमीच्या जागी उमेश यादव, शार्दुल ठाकुर यांना संधी देण्यात आली आहे.

कसोटी मालिकेचा चौथा सामना सुरू झाला तरीही भारताचा मुख्य फिरकी गोलंदाज आर अश्विनला कोणत्याच संधी देण्यात आली नाही.

भारत आणि इंग्लंड प्लेइंग इलेव्हन

भारत: केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

इंग्लंड: रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेविड मलान, जो रूट (कर्णधार), ओली पोप, जॉनी बेयरस्टो (यष्टीरक्षक), मोईन अली (उपकर्णधार), क्रिस वोक्स, क्रेग ओवरटन, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन.


हेही वाचा – IPL 2021PHASE 2: अर्जुन तेंडुलकर करणार मुंबई इंडियन्स कडून पदार्पण?


First Published on: September 2, 2021 7:29 PM
Exit mobile version