ICC Test Rankings : आयसीसी रँकिंगमध्ये विराट कोहली ७ व्या स्थानी, पंत- बुमराहचा फायदा

ICC Test Rankings : आयसीसी रँकिंगमध्ये विराट कोहली ७ व्या स्थानी, पंत- बुमराहचा फायदा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलने टेस्ट आणि वनडेच्या रँकिंग जाहीर केल्या आहेत. या रँकिंगमध्ये विराट कोहलीच्या चाहत्यांना सुखद बातमी आहे. कसोटी क्रिकेटच्या पहिल्या १० खेळाडूंमध्ये भारतीय संघातील दोन खेळाडूंची नावे आहेत. रोहित शर्मा ७७३ अंकांनी मागील वेळीसुद्धा पाचव्या स्थानी होता आणि आताही रोहितने आपले स्थान कायम ठेवलं आहे. परंतु सध्या टीम इंडियाच्या सर्व प्रकारातील संघाचे कर्णधारपद सोडणारा विराट कोहलीने ७६७ अंकांनी दोन स्थान वर उसळी मारली आहे. मागील वेळीच्या रँकिंगमध्ये विराट कोहली नवव्या स्थानी होता. यावेळी विराट कोहली आता सातव्या स्थानी पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशान्हे ९३५ अंकांसह पहिल्या स्थानी आहे.

कसोटी सामन्यात गोलंदाजांच्या रॅंकिंगमध्ये भारताच्या दोन गोलंदाजांचे नावाचा समावेश आहे. पहिल्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पेट कमिंस ८९८ अंकांसह आहे. तर भारतीय संघाचा स्पिनर गोलंदाज आर अश्विन ८३९ अंकांनी दुसऱ्या स्थानी आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ७६३ अंकांनी तिसऱ्या स्थानी पोहोचला असून टॉप-१० गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.

वनडे फॉर्मेटमध्ये गोलंदाजांच्या यादीमध्ये टीम इंडियामधील एकमात्र खेळाडू गोलंदाज जसप्रीत बुमराहचे नाव आहे. बुमराह ६७९ अंकांनी सातव्या स्थानी आहे. तर पहिल्या स्थानी ट्रेंट बोल्ट ७३७ अंकांसह आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत 1-2 अशा पराभवानंतर कोहलीने कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता आणि कर्णधार म्हणून सात वर्षांचा प्रवास संपला आहे. केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील कामगिरीवर क्रमवारीचे साप्ताहिक अपडेट पाहिले. ही कसोटी सात गडी राखून जिंकून यजमानांनी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप मालिका जिंकली. या सामन्यात 72 आणि 82 धावांची खेळी खेळून दक्षिण आफ्रिकेच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कीगन पीटरसनने 68 स्थानांची झेप घेत 33व्या स्थानावर पोहोचले आहे.


हेही वाचा : ICC Men’s T20I Team of the Year : आयसीसीकडून २०२१ च्या बेस्ट टी-२० प्लेइंग इलेव्हनची घोषणा, भारतीय खेळाडूंचा समावेश नाही

First Published on: January 19, 2022 5:46 PM
Exit mobile version