विराटची रन-मशीन पुन्हा सुरू; ठरला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

विराटची रन-मशीन पुन्हा सुरू; ठरला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याची रन-मशीन पुन्हा सुरू झाली आहे. सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात त्याने उत्तम फलंदाजी करत श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धनीचा विक्रम मोडीत काढला आहे. तसेच, विराट कोहली टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. (ind vs ban virat kohli t20 world cup highest run in mens t20 wc mahela jayawardene)

टी-20 विश्वचषकातील सुपर 12 फेरीतील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने इतिहास रचला आहे. टी-20 विश्वचषकातील अवघ्या 23 इनिंगमध्ये विराटने 1000 धावांचा टप्पा गाठला. या विक्रमासह विराटने महेला जयवर्धनेचा सर्वाधिक धावांचा विक्रमही मोडला. टी-20 विश्वचषकातील इतिहासात महेला जयवर्धनेने 31 डावात 1 हजार 16 धावा केल्या होत्या. मात्र विराटने अवघ्या 23 डावात 1000 धावा पुर्ण केल्या.

विराट कोहलीने यंदाच्या टी-20 विश्वचषकाची सुरुवात 845 धावांपासून सुरू केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 धावांची खेळी करण्यापूर्वी त्याने पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध नाबाद अर्धशतकी खेळी केली. या कामगिरीसह त्याने तिलकरत्ने दिलशान (897 धावा), रोहित शर्मा (904 धावा) आणि ख्रिस गेल (965 धावा) यांना मागं टाकून टी-20 विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्यानं जयवर्धनेचा विक्रम मोडला.

विराट कोहली त्याच्या टी-20 कारकिर्दीतील 5वा टी-20 विश्वचषक खेळत आहेत. विराटने आतापर्यंत 12 अर्धशतके झळकली आहेत. विराटने 2012 मध्ये पहिला टी-20 विश्वचषक खेळला. ज्यामध्ये त्याने 185 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2014 आणि 2016 च्या टी-20 विश्वचषकात विराट सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तसेच, टी-20 विश्वचषकात सर्वाधिक दोन वेळा सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूचा खिताब जिंकणारा विराट एकमेव खेळाडू आहे.


हेही वाचा – भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचे सावट; सामना रद्द झाल्यास कोणाला फायदा? वाचा सविस्तर

First Published on: November 2, 2022 3:43 PM
Exit mobile version