Ind Vs Eng 5th Test : पुढच्या वर्षी भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची घोषणा

Ind Vs Eng 5th Test : पुढच्या वर्षी भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची घोषणा

Ind Vs Eng 5th Test : पुढच्या वर्षी भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची घोषणा

कोरोना संकटामुळे भारताचा इंग्लंच्या दौऱ्यादरम्यान पाचवी टेस्ट मॅच झाली नव्हती. परंतु आता येत्या जुलै २०२२ मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना खेळवण्यात येणार असल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आलं आहे. या कसोटी सामन्यामध्ये भारत २-१ अशा फरकाने पुढे आहे. पुढच्या वर्षी एजबेस्टनमध्ये १ जुलै ते ५ जुलैपर्यंत कसोटी सामने खेळवण्यात येणार आहे. सप्टेंबरमध्ये भारतीय संघात काही कोरोनाचे प्रकरणं समोर आली होती. भारतीय संघाने कसोटी सामना खेळण्यास नकार दिला होता. यामुळे सामना अर्ध्यात सोडावा लागला होता. दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डानी निर्णय घेतला असून जुलै महिन्यात कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.

भारतीय टीम इंग्लंड दौऱ्यामध्ये कसोटी सामन्यासह टी-२० आणि एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. भारताला इंग्लंडमध्ये टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.

भारतीय संघाचा २०२२ मध्ये इंग्लंड दौरा

१ ते ५ जुलै – पाचवा कसोटी सामना
७ जुलै – पहिला टी-२० सामना
९ जुलै – दुसरा टी-२० सामना
१० जुलै – तीसरा टी-२० सामना
१२ जुलै – पहिला एकदिवसीय सामना
१४ जुलै – दूसरा एकदिवसीय सामना
१७ जुलै – तीसरा एकदिवसीय सामना


हेही वाचा : Ind vs Pak : पाकिस्तानी फॅन्समध्ये लाडका भारताचा इंझमाम कोण? शोएब अख्तर म्हणतो…


 

First Published on: October 22, 2021 7:52 PM
Exit mobile version