या फिरकीने भारत झाला पराभूत

या फिरकीने भारत झाला पराभूत

या फिरकीने भारत झाला पराभूत

भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील अखेरच्या कसोटीत भारत ११८ धावांनी पराभूत झाला असून सामन्यात भारत सावरत असतानाच इंग्लंडचा फिरकीपटू राशिदने अप्रतिन फिरकी बॉलवर राहुलच्या घेतलेल्या विकटने भारताला मोठा धक्का बसला. राशिदने घेतलेल्या विकेटचा व्हिडिओ सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. राशीद इंग्लंडचा फिरकीपटू असून त्याने संपूर्ण दौऱ्यात अप्रतिम कामगिरी केली. मात्र संपूर्ण दौऱ्यातील विकेट्सपेक्षा राशिदने कालच्या सामन्यात घेतलेली राहुलची विकेट सर्वात अप्रतिम असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

अशी होती राशिदची फिरकी

सामन्यातील ८२ वी ओव्हर टाकताना राशीदने राहुलची विकेट घेतली. ओव्हरचा पहिलाच बॉल उजव्या हाताने बॅटिंग करणाऱ्या राहुलच्या डाव्या पायाजवळ पडला टप्पा पडल्यानंतर बॉल उजव्या बाजूला फिरकी घेत स्टंपवर जावून आदळला आणि बेल्स पडताच राहुलची विकेट गेली. बॉल सुरूवातीला वाइड जाईल असे वाटत असतानाच बॉलने घेतलेल्या अप्रतिम फिरकीने राहुल बाद झाला.

…आणि भारत पराभूत झाला.

राशीदच्या अप्रतिम फिरकीमुळे १४९ धावांवर खेळणारा के. एल. राहुल बाद झाला आणि सामन्यातील भारताच्या आशा मावळल्या. भारत दुसऱ्या डावात इंग्लंडने उभा केलेल्या ४६४ धावांचा पाठलाग करताना भारताचे बरेच खेळाडू पटापट बाद झाले. मात्र राहुल आणि पंत यांच्या अप्रतिम शतकामुळे भारत जिंकेल असे वाटत असतानाच राशिदने राहुलचा विकेट घेतला आणि भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या.

असा झाला इंग्लंडचा दौरा

भारताच्या इंग्लंड दौऱ्यात ३ टी-२०, ३ एकदिवसीय आणि ५ कसोटी सामने खेळवले गेले. ज्यात टी-२० मालिकेत फक्त भारताने विजय मिळवला. टी-२० मध्ये भारताने २-१ च्या फरकाने विजय मिळवला. मात्र एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. ज्यात एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-१ ने तर कसोटी मालिकेत ४-१ च्या फरकाने भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे.

First Published on: September 12, 2018 1:34 PM
Exit mobile version