कसोटी क्रिकेटमध्ये अनोखा पराक्रम करणारा ‘हा’ ठरला जगातील पहिला स्पिनर

कसोटी क्रिकेटमध्ये अनोखा पराक्रम करणारा ‘हा’ ठरला जगातील पहिला स्पिनर

डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. त्याने ३८ धावा करून ६ विकेट घेतल्या. यासह पहिल्या डावात इंग्लंडला ११२ धावांना रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अक्षर पटेलने पिंक बॉल टेस्टद्वारे पदार्पण केले. यावेळी त्याने पहिल्याच बॉलवर जॉनी बेयर्स्टोला एलबीडब्ल्यू केले. यासह, तो भारतीय भूमीवर पिंक बॉलने विकेट घेणारा पहिला भारतीय फिरकीपटू ठरला. त्यानंतर, त्याने जॅक क्रॉले, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड आणि विकेटकीपर बेन फोक्स यांची विकेट घेतली. अक्षरने २१.४ ओव्हरमध्ये ३८ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या.

चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या मालिकेच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या अक्षरने ६० धावांत ५ विकेट घेतल्या. आपल्या घरच्या मैदानावर कारकीर्दीची दुसरी कसोटी खेळताना त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. कारकीर्दीतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये सलग ५ विकेट घेणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी मोहम्मद निसार आणि नरेंद्र हिरवाणी यांनी हा पराक्रम केला होता.

इंग्लंड विरुद्ध चेन्नई आणि अहमदाबाद कसोटीत त्याने हा पराक्रम केला. आतापर्यंत खेळलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या तीन डावांमध्ये अक्षर पटेलने १०.६२ च्या सरासरीने १३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने चेन्नईत खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात  ४० धावांत २ विकेट्स घेतल्या. यानंतर दुसऱ्या डावात ६० धावा देऊन ५ विकेट्सने  घेऊन संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आता अहमदाबादमध्ये ६ विकेट्ससह त्याने आणखी एक उत्कृष्ट कामगिरी हा पराक्रम आपल्या नावे केला आहे.

First Published on: February 25, 2021 8:57 AM
Exit mobile version