IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतावर ICC ची दंडात्मक कारवाई, काय आहे कारण?

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतावर ICC ची दंडात्मक कारवाई, काय आहे कारण?

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतावर ICC ची दंडात्मक कारवाई, काय आहे कारण?

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात परभव झाला आहे. भारताकडून या मालिकेत खराब प्रदर्शन झाले. पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघ पुन्हा पुनरागमन करेल असे वाटत होते परंतु दुसरा सामनाही भारताने गमावला. रविवारी केपटाऊनच्या न्यूलैंडमध्ये खेळवण्यात आलेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवाच्या एक दिवसानंतर भारतीय संघावर आयसीसीकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंन्सिलने टीम इंडियावर दंड आकारला आहे. संघाच्या कर्णधारासह संघातील सर्व खेळाडूंची मॅच फी कपात करण्याचा आदेश आयसीसीने दिला आहे. तिसऱ्या वनडे इंटरनॅशनल सामन्यात स्लो ओवर रेटमुळे संघावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. भारतीय संघाच्या खेळाडूंची ४०-४० टक्के मॅच फी कपात करण्यात येणार आहे. आयसीसी एलीट पॅनलचे पंच एंडी पीक्रॉप्ट यांनी कर्णधार केएल राहुलच्या संघावर दंड आकारला आहे.

भारतीय संघाने निर्धारित वेळेत फक्त ४८ षटक टाकले असून शेवटच्या दोन षटकांना वेळ लागला आहे. यामुळे आयसीसीने दंड आकारला आहे. एका षटकासाठी खेळाडूंच्या फीमध्ये २० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. अशा प्रकारे २ षटक उशीरा टाकले असल्यामुळे दोन्ही षटकांचे मिळून असे ४० टक्के कपात करण्यात आली आहे. आयसीसी आचार संहिता अन्वये २.२२ नुसार भारतीय संघाला दोषी ठरवण्यात आले असून कर्णधार केएल राहुलने हे स्वीकारले आहे. यामुळे या प्रकरणावर सुनावणी होणार नाही. मैदानावरील पंच मराइस इरासमस आणि बोनगानी जेले, थर्ड अंपायर अलाउद्दीन पालेकर आणि फोर्थ अंपायर एड्रियन होल्डस्टॉक यांच्याकडून भारतीय संघावर स्लो ओव्हर रेट विरोधात आरोप केले आहेत.


हेही वाचा : Ind Vs Sa : कर्णधारपदाच्या वादामुळे टीम इंडियाला धक्का?, आफ्रिका दौऱ्यात लाजीरवाणी कामगिरी

First Published on: January 24, 2022 6:31 PM
Exit mobile version