Ind Vs Wi, 1000 ODI Match: १००० वा एकदिवसीय सामना खेळणारा भारत पहिलाच देश, असा आहे प्रवास?

Ind Vs Wi, 1000 ODI Match: १००० वा एकदिवसीय सामना खेळणारा भारत पहिलाच देश, असा आहे प्रवास?

Ind Vs Wi, 1000 ODI Match: १००० वा एकदिवसीय सामना खेळणारा भारत पहिलाच देश, असा आहे प्रवास?

भारत आणि वेस्टइंडिजविरुद्ध गुजरातच्या अहमदाबाद येथील मैदानावर ६ फेब्रुवारीला खेळवण्यात येणारा एकदिवसीय सामना एतिहासिक होणार आहे. भारतीय संघाचा हा १०००वा एकदिवसीय सामना असून असा इतिहास रचणारा भारत हा पहिलाच देश ठरणार आहे. १९७४ पासून सुरु झालेल्या क्रिकेटच्या प्रवासात भारताला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे.

भारताने पहिला एकदिवसीय सामना १९७४ साली इंग्लंडविरुद्ध खेळला होता. १३ जुलै रोजी लीड्समध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघ ४ विकेट्सने पराभूत झाला होता. यावेळी भारताचे कर्णधार अजित वाडेकर होते परंतु यानंतर भारतीय संघाने चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. भारत सर्वाधिक एकदिवसीय सामना खेळणारा पहिला देश आहे. भारतानंतर ऑस्ट्रेलियाचा नंबर लागतो. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ९५८ सामने खेळले आहेत. भारताने आतापर्यंत ९९९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामधील भारताने ५१८ सामने जिंकले आहेत तर ४३१ सामने गमावले आहेत. पहिल्या एकदिवसीय सामन्यापासून ते १००० व्या एकदिवसीय सामन्यापर्यंत संघाचा प्रवास असा राहिला आहे.

पहिला एकदिवसीय सामना भारतविरुद्ध इग्लंड १३ जुलै १९७४ रोजी लीड्स येथे खेळवला गेला. यावेळी भारत ४ विकेट्सने सामना पराभूत झाला. कर्णधार अजित वाडेकर होते.

१०० वा एकदिवसीय सामना भारतविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात आला होता. ९ सप्टेंबर १९८६ रोजी कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने ३ विकेट्सने सामना गमावला.

२०० वा एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात आला होता. २० जानेवारी १९९२ रोजी सिडनी येथे हा सामना झाला होता. भारत ६ धावांनी पराभूत झाला होता. भारताचा कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन होता.

३०० वा एकदिवसीय सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यात आला होता. राजकोट येथे २९ ऑक्टोबर १९९६ रोजी हा सामना झाला. भारत ५ विकेटने पराभूत झाला. यावेळी भारताचा कर्णधार सचिन तेंडुलकर होता.

४०० वा एकदिवसीय सामना केनियाविरुद्ध खेळवण्यात आला होता. २३ मे १९९९ साली हा सामना झाला असून भारताने ९४ धावांनी सामना जिंकला. भारताचा कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन होता.

५०० वा एकदिवसीय सामना इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात आला होता. सौरव गांगुलीच्या नेतृत्वात सामना खेळवण्यात आला असून यावेळचा निकाल आला नाही.

६०० वा एकदिवसीय सामना श्रीलंकेविरुद्ध खेळवण्यात आला होता. ९ नोव्हेंबर २००५ साली राजकोट येथे विरेंद्र सेहवागच्या नेतृत्वात खेळवण्यात आला. भारताने हा सामना ७ विकेट्सने जिंकला.

७०० वा एकदिवसीय सामना इंग्लंडविरोधात खेळवण्यात आला होता. २३ नोव्हेंबर २००८ मध्ये बंगळूरु येथे भारताने १९ धावांनी सामना जिंकला. यावेळी महेंद्र सिंह धोनीने सामना जिंकला.

८०० वा एकदिवसीय सामना भारतविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये होता. २६ फेब्रुवारी २०१२ मध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताचा ८७ धावांनी पराभव झाला होता. कर्णधार महेंद्रसिंह धोनी नेतृत्व करत होता.

९०० वा एकदिवसीय सामना न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळवण्यात आला होता. १६ ऑक्टोबर २०१६ मध्ये सामना झाला. यावेळी महेंद्रसिंह धोनी संघाचे नेतृत्व करत होता. भारताने ६ गडी राखून हा सामना जिंकला.

९९९ वा एकदिवसीय सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवण्यात आला होता. या सामन्यावेळी के एल राहुल संघाचे नेतृत्व करत होता. भारताने सामना ४ धावांनी गमावला.

१००० वा एकदिवसीय सामना भारत विरुद्ध वेस्ट इंडिज असा होणार आहे. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी हा सामना होणार आहे. यावेळी भारताचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे.


हेही वाचा : IND vs WI : ऋषभ पंत मालामाल, मोठा करार करत विराट-रोहितच्या खास यादीत समावेश

First Published on: February 5, 2022 6:21 PM
Exit mobile version