घरक्रीडाIND vs WI : ऋषभ पंत मालामाल, मोठा करार करत विराट-रोहितच्या खास...

IND vs WI : ऋषभ पंत मालामाल, मोठा करार करत विराट-रोहितच्या खास यादीत समावेश

Subscribe

ऋषभ पंत कंपनीसोबतचा करार वाढवल्यानंतर म्हणाला, “मी खूप दिवसांपासून एसजी बॅट वापरत आहे. माझ्या अनेक संस्मरणीय खेळी या कंपनीच्या बॅटने आल्या आहेत. ही भागीदारी पुढे नेण्यात मला आनंद होत आहे.”

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय सामना रविवारी खेळवण्यात येणार आहे. यापूर्वीच भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंत करोडोंची डील करत मालामाल झाला आहे. पंतने क्रिकेट किट तयार करणाऱ्या एसजी कंपनीसोबत सात वर्ष जुनी असलेल्या बॅटच्या कराराचे नुतनीकरण केले आहे. भारतात पंत आता विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर बॅट अॅन्डॉर्समेंटद्वारे भारतातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू बनेल. ऋषभ पंतला त्याच्या बॅटवर एसजी कंपनीचा लोगो वापरण्यासाठी ३ कोटी रुपये मिळणार आहेत.

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने यापूर्वी एमआरएफ कंपनीसोबत १०० करोड रुपयांची ८ वर्षासाठी करार केला होता. तर रोहित शर्मासुद्धा त्याच्या बॅटवर लोगो वापरण्यासाठी करोडो रुपये आकारतो. २०१८ मध्ये सिएटसोबत करार केला होता यामध्ये वर्षाला कंपनी ४ करोड रुपये देते. शिखर धवनलासुद्धा एमआरएफ कंपनीचा लोगो लावण्यासाठी कंपनी वर्षाला २.५ करोड रुपये देते. आता हा करार संपला असून सध्या धवन कुकाबुरा बॅटने खेळतो.

- Advertisement -

पंत आता बॅटने करोडोंची कमाई करणार

स्पोर्ट्स टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स, जी पंतचे काम पाहते, त्याने असा दावा केला आहे की आता बॅट एंडोर्समेंटद्वारे विकेटकीपर बॅट्समन देशातील सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू बनला आहे. क्रिकेटच्या वस्तू बनवणाऱ्या कंपनीने राहुल द्रविड, सुनील गावस्कर आणि मोहम्मद अझरुद्दीन यांसारख्या दिग्गज फलंदाजांशी यापूर्वीच असे करार केले आहेत.

कंपनीसोबतचा करार वाढवल्याबद्दल पंत आनंदी

ऋषभ पंत कंपनीसोबतचा करार वाढवल्यानंतर म्हणाला, “मी खूप दिवसांपासून एसजी बॅट वापरत आहे. माझ्या अनेक संस्मरणीय खेळी या कंपनीच्या बॅटने आल्या आहेत. ही भागीदारी पुढे नेण्यात मला आनंद होत आहे.”

- Advertisement -

हेही वाचा : IPL: ऋषभ पंतला टक्कर देणार दिनेश बाना, U19 World Cup मध्ये 500 च्या स्ट्राइक रेटने बनवल्या धावा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -