WTC : भारताची चौथ्या स्थानी घसरण; फायनल गाठण्यासाठी ‘हे’ करावे लागणार 

WTC : भारताची चौथ्या स्थानी घसरण; फायनल गाठण्यासाठी ‘हे’ करावे लागणार 

अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, विराट कोहली

चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारताला २२७ धावांनी पराभूत केले. या पराभवामुळे भारतीय संघाची जागतिक कसोटी अजिंक्यपद (World Test Championship) स्पर्धेच्या गुणतक्त्यात चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. तर हा सामना जिंकल्यामुळे इंग्लंडने अव्वल स्थानावर झेप घेतली. न्यूझीलंडने आधीच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्यांच्याविरुद्ध खेळण्यासाठी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धा आहे. चेपॉकवर झालेला पहिला कसोटी सामना जिंकण्यासाठी इंग्लंडने भारतापुढे ४२० धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव १९२ संपुष्टात आला. कर्णधार विराट कोहलीने एकाकी झुंज देत १०४ चेंडूत ७२ धावांची खेळी केली.

भारताची गुण सरासरी ६८.३ 

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत आणि इंग्लंड ही अखेरची कसोटी मालिका असणार आहे. न्यूझीलंडने लॉर्ड्सवर होणाऱ्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आधीच प्रवेश केला आहे. भारताला आता अंतिम फेरी गाठायची असल्यास इंग्लंडविरुद्धची मालिका २-१ किंवा ३-१ अशी जिंकावी लागेल. गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर असणाऱ्या भारताचे एकूण ४३० गुण असून त्यांची गुण सरासरी ६८.३ इतकी आहे. दुसरीकडे इंग्लंडला अंतिम सामन्यात खेळायचे असल्यास त्यांना ही मालिका ३-१, ३-० किंवा ४-० अशी जिंकावी लागणार आहे.


हेही वाचा – पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा ‘या’ कारणांमुळे पराभव!


 

First Published on: February 9, 2021 8:40 PM
Exit mobile version