ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारताला मोठा धक्का, स्टार खेळाडू संघाबाहेर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारताला मोठा धक्का, स्टार खेळाडू संघाबाहेर

महिलांच्या टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात महत्त्वाचा सामना केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. परंतु सामन्यापूर्वी दोन स्टार खेळाडू संघाबाहेर गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय खेळाडू हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर उपांत्य फेरीत खेळू शकणार नाहीत.

वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकरला श्वसनाच्या त्रासामुळे संघाबाहेर जावे लागले आहे. पूजा वस्त्राकरच्या जागी कोण खेळणार आहे याची माहिती देखील आता देण्यात आली आहे. पूजा वस्त्राकरच्या जागी आता स्नेह राणाचा संघात समावेश करण्यात आला आहे.

हरमनप्रीत कौरने महिला टी-२० विश्वचषकाच्या गट टप्प्यात चांगली कामगिरी केलेली नाही. तिने ४ सामन्यात केवळ ६६ धावा केल्या. पण तिच्या नेतृत्वाखाली संघाने ४ पैकी ३ सामने जिंकले. पूजा वस्त्राकर ही संघाची अनुभवी गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे आणि गट टप्प्यातील सर्व सामन्यांमध्ये ती खेळताना दिसली आहे. महिला टी-२० विश्वचषकातील ४ सामन्यात २ विकेट घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा संघही या स्पर्धेत आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ आपल्या गटातील चारही सामने जिंकून पहिल्या स्थानावर कायम आहे.


हेही वाचा : आयसीसीच्या कसोटीतील गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा गोलंदाज जेम्स ॲंडरसन अव्वल


 

First Published on: February 23, 2023 5:07 PM
Exit mobile version