टी २० विश्वचषकानंतर भारतीय संघ करणार न्यूझीलंड दौरा

टी २० विश्वचषकानंतर भारतीय संघ करणार न्यूझीलंड दौरा

ऑस्ट्रेलियातील (Australia) टी २० विश्वचषकानंतर (T-20 World Cup) भारतीय संघ तीन टी २० आणि तीन वनडे (ODI) सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने (न्यूझीलंड क्रिकेट) आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे. (India tour of New Zealand after t20 world cup)

आयपीएलनंतर (IPL 2022) भारतीय संघ दौरे करत असून मायदेशात मालिका खेळत आहे. एकामागोमाग एक मालिका असल्यामुळे भारतीय संघाचे दोन गट करण्यात आले आहेत. त्यानुसार, एक गट दक्षिण आफ्रिकेसोबत खेळला तर, दुसरा गट इंग्लंडसोबत खेळणार आहे. नुकताच भारतीय संघ आयरलॅंडसोबत खेळत आहे. त्यानंतर आता भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भारताचा न्यूझीलंड दौरा

न्यझीलंड दौऱ्यात भारतीय संघ तीन टी-२०, तीन वनडे असे एकूण ६ सामने खेळणार आहे. भारताचा सहा सामन्यांचा हा दौरा १८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी जानेवारीमध्ये न्यूझीलंडचा संघ पुन्हा भारतामध्ये येणार आहे. या दौऱ्याबाबत “वेलिंग्टन, तौरंगा आणि नेपियर येथे तीन टी २० आणि ऑकलंड, हॅमिल्टन आणि क्राइस्टचर्च येथे तीन वनडे सामने खेळण्यासाठी भारत न्यूझीलंड दौरा करेल. टी २० विश्वचषकाच्या समारोपानंतर हा दौरा असेल”, असे न्यूझीलंड क्रिकेटने म्हटले.

“भारताचा न्यूझीलंड दौरा झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौर्‍यासाठी रवाना होईल. पाकिस्तान दौऱ्या पाठोपाठ न्यूझीलंडचा संघ भारतातही टी-२० आणि वनडे मालिका खेळेल”, असेही क्रिकेट न्यूझीलंडने सांगितले.

न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक


हेही वाचा – टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड; ऑस्ट्रेलियाला टाकले मागे

First Published on: June 28, 2022 7:29 PM
Exit mobile version