अफगाणिस्तानचा पदार्पण सामन्यात २६२ धावांनी पराभव

अफगाणिस्तानचा पदार्पण सामन्यात २६२ धावांनी पराभव

अफगाणिस्तानचा संघ

आयसीसीकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेल्या अफगाणिस्तानचा संघ आपल्या पदार्पण सामन्यात खास कामगिरी करू शकला नाही. भारताने अफगाणिस्तानवर १ डाव २६२ धावांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे भारताने एका दिवसात दोनदा अफगाणिस्तानला ऑलआऊट करत सामना जिंकला आहे.

पहिल्या डावात भारताकडून ४७४ धावांचे आव्हान अफगाणिस्तानला मिळाले असता अफगाणिस्तानचा संघ पहिल्या इनिंगमध्ये अवघ्या १०९ रन्समध्ये ढेपाळला. ज्यानंतर भारताने दिलेल्या लक्षाचा पाठपुरावा करताना दुसऱ्या इनिंगमध्ये अफगाणिस्तानचा संघ १०३ रन करून ऑलआऊट झाला आणि ही कसोटी २ दिवसांत संपवत भारताने २६२ धावांनी विजय आपल्या नावावर कोरला. या सामन्यात भारताने इतिहास रचला. पहिल्याच वेळेस भारताने कसोटी सामना दोन दिवसात संपवला असून इतक्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.

पहिल्या इनिंगमध्ये भारताकडून रविचंद्रन आश्विनने अप्रतिम बॉलिंग करत ३.२७ इकोनॉमीने २७ रन देत ४ विकेट घेतल्या. यासोबतच इशांत शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या तर उमेश यादवने सर्वात चांगल्या ३ च्या इकोनॉमीने १८ रन देत १ विकेट घेतली. तर दुसऱ्या इंनिगमध्ये रविंद्र जडेजाने उत्तम बॉलिंग करत १.८९ च्या इकोनॉमीने १७ रन देत ४ विकेट घेतल्या तर उमेश यादवने ३, इशांतने २ आणि आश्विनने १ विकेट घेतली. भारतीय बॉलर्सच्या या अप्रतिम प्रदर्शनामुळे अफगाणिस्तानचा संघ इतक्या मोठ्या फरकाने हरला. अफगाणिस्तान संघाच्या एकाही बॅट्समनने चांगली कामगिरी केली नाही. सर्वाधिक २५ धावा अफगाणिस्तानकडून असगर स्टॅनिकजई याने केल्या.

रविचंद्रन आश्विन

अशी झाली भारताची पहिली इंनिग

दरम्यान सामन्याच्या पहिल्या दिवशी आपल्या धमाकेदार बॅटिंगने भारतीय बॅट्समनने अफगाणिस्तानच्या बॉलर्सना अक्षरशः धुवून काढले. दिवसाखेरीस भारताच्या ३४७ धावा झाल्या असून ६ विकेट गेल्या, यात शिखर धवनने केलेल्या शतकाने एक नवा विक्रम केला. टेस्ट मॅचमध्ये लंच ब्रेकपूर्वी शतक पूर्ण करणारा पहिला भारतीय तर जगातील सहावा बॅट्समन ठरला. मुरली विजयने देखील शतक झळकावले, तर के एल राहुलनेही ६४ बॉल्स मध्ये ५४ रन करत अर्धशतक झळकावले. यानंतर दुसऱ्या दिवशी भारताकडून पांड्या आणि अश्विन बॅटिंगला आले आणि पांड्याकडून केल्या गेलेल्या अर्धशतकाने भारत ४७४ धावापर्यंत पोहचला.

शिखर धवन
First Published on: June 16, 2018 3:08 PM
Exit mobile version