भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून (9 फेब्रुवारी) बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका सुरू होणार आहे. उभय संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका होणार असून त्यातील पहिला सामना नागपुरात सकाळी साडेनऊ वाजल्यापासून होणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि आयसीसी रँकिंगच्या दृष्टीने टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे.

या मालिकेसाठी रोहित शर्मा भारतीय कर्णधार असून केएल राहुलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. कसोटी मालिकेत भारतीय संघ गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्चस्व गाजवत आहे. (india vs australia test series rohit sharma pat cummins ind vs aus nagpur match)

2014 पासून, तीन कसोटी मालिका झाल्या आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. अशा स्थितीत पुन्हा एकदा भारतीय संघ ही मालिका जिंकून इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. दरम्यान, 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाने कसोटी मालिका 2-1ने जिंकली होती.

एकूण कसोटी रेकॉर्डमध्ये ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध वरचढ असल्याचे दिसते. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 102 कसोटी सामने झाले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 43 जिंकले आहेत. भारतीय संघाने 30 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. तर 28 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्याचा विक्रम

नागपूर कसोटीसाठी दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल/शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुभमन गिल/सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल/कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि सिराज .

ऑस्ट्रेलिया संघ : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (क), अॅश्टन अगर/टॉड मर्फी, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

कसोटी मालिकेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (क), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ ( उपकर्णधार), मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन आणि डेव्हिड वॉर्नर.

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 2023


हेही वाचा – ‘या’ खेळाडूला भारतीय संघातील स्थानाबाबत साशंकता, पण रणजी ट्रॉफीमध्ये शतकी खेळी

First Published on: February 9, 2023 8:09 AM
Exit mobile version