IND vs ENG 2nd ODI : बेन स्टोक्सने पुन्हा केली ‘तीच’ चूक! पंचांनी दिली ताकीद 

IND vs ENG 2nd ODI : बेन स्टोक्सने पुन्हा केली ‘तीच’ चूक! पंचांनी दिली ताकीद 

बेन स्टोक्स

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना शुक्रवारी (आज) पुण्यात खेळला जात आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे तो दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्याला मुकणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत जॉस बटलर इंग्लंडचे नेतृत्व करत असून दुसऱ्या सामन्यात त्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या डावात इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने चेंडूला तकाकी आणण्यासाठी थुंकीचा वापर केला. मात्र, कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) थुंकीच्या वापरावर बंदी घातली आहे. असे असतानाही स्टोक्सने चेंडूवर थुंकी लावल्याने पंचांची त्याला ताकीद दिली.

त्यावेळीही पंचांनी दिली होती ताकीद

भारताच्या डावातील चौथ्या षटकात हा प्रकार घडला. स्टोक्सने चुकीने चेंडूला तकाकी आणण्यासाठी थुंकीचा वापर केला. त्यानंतर पंच नितीन मेनन आणि विरेंद्र शर्मा यांनी स्टोक्सला, तसेच कर्णधार बटलरला ताकीद दिली. त्यानंतर चेंडूवर सॅनिटायझर मारून पुन्हा सामन्याला सुरुवात झाली. स्टोक्सने ही ‘चूक’ केल्याची या दौऱ्यातील ही पहिली वेळ नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यात याआधी कसोटी मालिका झाली. या मालिकेतील तिसऱ्या (डे-नाईट) कसोटीत स्टोक्सने चेंडूवर थुंकीचा वापर केला होता. त्यावेळीही पंचांनी त्याला ताकीद देण्याचा निर्णय घेतला होता.

First Published on: March 26, 2021 3:48 PM
Exit mobile version